मुंबई, 14 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) आणि त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता शबाना आझमी यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्याशी असलेल्या आनंदी वैवाहिक जीवनाचे म्हणजे सुखी संसाराचे गुपित उघड केलं आहे. जेव्हा जेव्हा दोघांमध्ये भांडण होते तेव्हा डोके शांत होईपर्यंत एकमेकांशी बोलत नाहीत आणि जसा राग कमी होतो तसं मग लगेच दोघंही बोलायला सुरूवात करत असल्याचं शबाना यांनी सांगितलं आहे. आपल्या साथीदाराला थोडा स्पेस देणं गरजेचे आहे त्यामुळे नाती टिकण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितलं.
फ्री प्रेस जर्नलशी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या की, “वैवाहिक जीवनात नातेसंबंध टिकवणे महत्वाचे आहे. पण तुम्हाला त्यावर काम करावे लागेल त्याला वेळ द्यावा लागेल. मला हे विचित्र वाटते की, आपण आपले मित्र आणि सहकाऱ्यांना वेळ देतो त्यांना समजून घेतो मात्र आपल्या जोडीदारासोबत असं वागंत नाही कारण त्याला आपण महत्त्व देत नाही किंवा ग्राह्य धरत नाही. आपण कधीच एकमेकांचा विचार करत नाही व आदर देखील नाही करत. प्रेमाबद्दल माझे मत असे आहे की, आपण आपल्या जोडीदाराला कमी लेखू नये. उलट आपल्या जोडीदाराच्या मताचा आदर केला पाहिजे व त्याचा देखील वैयक्तिक स्पेस असु शकतो हे मान्य करायला पाहिजे. तसेच त्या पुढे म्हणल्या की, सुदैवाने, आम्ही दोघेही आमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
दोघांच्यात भांडण झाल्यावर ते कसं मिटवता असा प्रश्न यावेळी शबाना यांना विचारला. तेव्हा शबाना आझमी म्हणाल्या, एक असा शब्द आहे ज्यामुळे आमच्यातील भांडण संपवण्यास मदत झाली आहे. ते शब्द म्हणजे सोडून दे आता...दु: खी होऊ नको आणि हे जास्त दिवस चालणार नाही. दोघंही जेव्हा चांगल्या मानसिक स्थितीत असतो, तेव्हा दोघं एकमेंकासोबत बोलतो. शेवटी राग तुम्हाला अस्वस्थ करतो आणि नको त्या गोष्टी आपण करतो त्यामुळे तुम्हाला फक्त पश्चात्ताप करावा लागतो.
शबाना आणि जावेद यांनी 1984 मध्ये लग्न केले. ते मुंबईत एकत्र राहतात आणि त्यांना मुले नाहीत. मात्र, शबाना यांचे जावेद अख्तरची पहिली पत्नी हनी इराणीचा मुलगा बॉलिवू़ड अभिनेता फरहान अख्तर आणि मुलगी झोया अख्तर यांच्याशी अगदी जवळचे संबंध आहेत. झोया अख्तर ही इंडस्ट्रीचे लोकप्रिय चित्रपट निर्मात्यापैकी एक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment