मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'ऑस्कर जिंकणारी तू पहिली जोनस असशील...', प्रियांकाबाबत निकने व्यक्त केला विश्वास

'ऑस्कर जिंकणारी तू पहिली जोनस असशील...', प्रियांकाबाबत निकने व्यक्त केला विश्वास

Priyanka chopra and Nick Jonas

Priyanka chopra and Nick Jonas

प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) नेटफ्लिक्सवरील (Netflix) चित्रपट द व्हाईट टायगर (The White Tiger) चांगलाच गाजत आहे. हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत उतरणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान प्रियांकाचा नवरा निक जोनस (Nick Jonas) देखील याबाबतीत प्रियांकाला पाठिंबाच देत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 जानेवारी: प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) नेटफ्लिक्सवरील (Netflix) चित्रपट द व्हाईट टायगर (The White Tiger) चांगलाच गाजत असून, सर्वत्र त्याची प्रशंसा होत आहे. आता हा चित्रपट ऑस्करच्या (Oscar Award) स्पर्धेत उतरणार असल्याची चर्चा असून, असं झाल्यास प्रियांकाला नक्की ऑस्कर मिळेल असा विश्वास तिचा पती आणि प्रसिद्ध गायक, संगीतकार निक जोनस (Nick Jonas) यानं व्यक्त केला आहे. ‘तू पहिली ऑस्कर जिंकणारी पहिली जोनस असशील...' अशा शब्दात त्यानं प्रियांकाला प्रोत्साहन दिलं आहे.

प्रियांका आणि निक जोनस यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. हे दोघं कधीही जाहीरपणे एकमेकांसंबंधी भरभरून बोलताना थकत नाहीत. त्यांचे लग्न झाल्यापासून ही जोडी परस्परातील नात्याविषयी अनेक गोष्टी शिकत आहे. त्यांच्यातील प्रेम, विश्वास याचं दर्शन नेहमीच त्यांच्या वागण्या, बोलण्यातून घडत असतं, त्यामुळं या जोडीचे जगभरात असंख्य चाहते आहेत.

प्रियांकाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटाची जगभरातून प्रशंसा होत आहे. निक जोनस आपल्या पत्नीच्या या यशामुळं अतिशय आनंदी आहे. दरम्यान या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाल्याचीही चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत प्रियांकानं सांगितलं होतं की, तिच्या नवऱ्याला असा विश्वास आहे की ती या सिनेमासाठी ऑस्कर जिंकू शकते. ऑस्कर जिंकणारी ती पहिली जोनस असेल, असंही निकने तिला सांगितल्याचंही प्रियांका म्हणाली.

हे वाचा - KGF2 Release Date: ठरलं! या तारखेला प्रदर्शित होणार बहुचर्चित सिनेमा

जस्ट जारेडच्या व्हरायटीज अवॉर्ड्स सर्किट पॉडकास्टवर हजेरी लावताना प्रियांका चोप्रानं सांगितलं की, ऑस्कर जिंकणारी तू पहिला जोनस असशील अशी त्याची अगदी सहज प्रतिक्रिया होती. या संभाषणादरम्यान प्रियांका आपल्या प्रेमळ आणि पाठबळ देणाऱ्या नवऱ्याबद्दल भरभरून बोलण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. ‘तो कधीच काहीच वाईट करत नाही. त्याचा हा स्वभाव मला वेड लावतो. तू जे काही करतेस ते ग्रेट आहे, अशा प्रकारचं ते वागणं असतं.’

दरम्यान,  त्याच मुलाखतीत तिने ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात काम करण्याविषयीही सांगितलं. ती ज्याप्रकारच्या चित्रपटाच्या, कथानकाच्या शोधात होती त्या प्रकारचा हा चित्रपट आहे. वेगवेगळ्या छटा असलेली भूमिका तिला करायची होती, एखाद्या ठराविक चौकटीतील, साचेबद्ध भूमिका तिला नको होती, ती अपेक्षा या चित्रपटानं पूर्ण केली. या चित्रपटामधील तिनं साकारलेली पिंकी आधुनिक भारतातील मुलगी आहे. ती जगाशी जोडलेली आहे. ती शिकलेली आहे, तिला संधीची, हक्कांची आणि मार्गांचीही जाणीव आहे, असं प्रियांकानं आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितलं.

(हे वाचा-The White Tiger: जोनस कुटुंबानंतर हृतिक रोशननेही केलं प्रियांंका चोप्राचं कौतुक)

प्रियांका सध्या ‘द व्हाइट टायगर’च्या प्रसिद्धीबरोबरच ब्रिटनमध्ये मॅट्रिक्स 4 आणि टेक्स्ट फॉर यू या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त, ती रूसो ब्रदर्सच्या सिटाडेल मालिकेत रिचर्ड मॅडनबरोबर दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Hollywood, Netflix, Nick jonas, Priyanka chopra