मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /जोनस कुटुंबानंतर हृतिक रोशननेही केलं प्रियांंका चोप्राचं कौतुक, The White Tiger ठरतोय हिट

जोनस कुटुंबानंतर हृतिक रोशननेही केलं प्रियांंका चोप्राचं कौतुक, The White Tiger ठरतोय हिट

Hrithik Roshan

Hrithik Roshan

The white tiger हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. तसेचं बॉलिवूड मधल्या इतर कलाकारांनी सुद्धा प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव ह्या जोडीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

मुंबई,30 जानेवारी: प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांचा ' The white tiger ' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स (Netflix) वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीच उतरत असुन ह्या चित्रपटाला सर्वच स्तरांमधून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) देखील शुक्रवारी हा चित्रपट पाहिला आणि प्रियांका चोप्रा, राजकुमार राव आणि संपुर्ण टीमचे तोंडभरून कौतुक केले आहे.

हृतिकने आपल्या सोशल मिडीयावरून प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांना त्यांच्या शानदार अभिनयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकने ट्वीट करत लिहिलंय की, ‘शुक्रवारी ' The white tiger ' हा चित्रपट पाहिला. प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव ह्यांच्याकडून शानदार अभिनयाचे प्रदर्शन! माझ्याकडून तुम्हा दोघांनाही सलाम. गौरव आदर्श हा एक उभरता अभिनेता आहे. तसेच ह्या नवीन वर्षासाठी ही एक आशादायक सुरवात आहे. चांगलं प्रदर्शन केल्याबद्दल रहीम बहरानी आणि टीमचे अभिनंदन! "

यावर प्रत्युतर देताना प्रियांकाने देखील हृतिकचे आभार मानले आहेत. प्रियांकाने लिहिलय की, "थँक्यू सो मच दोस्त! तुला चित्रपट आवडला ह्याचं मला खुप समाधान आहे.!’’

या सिनेमाच्या निमित्ताने प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा झळकली  आहे. अभिनेता आदर्श गौरव (Adarsh Gourav) ही या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या सिनेमामध्ये प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव एनआरआय (NRI) जोडप्याच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नोकर आणि ड्रायव्हर म्हणून आदर्श गौरवची एन्ट्री होते. असं दाखवण्यात आलं आहे.

(हे वाचा- थिएटरमध्ये पाहता येणार 'रामायण'; 300 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटासाठी कोण साकारणार रामाची भूमिका?)

द व्हाइट टायगर हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. 2008 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने 40 वा बुकर अवॉर्ड जिंकला होता. द व्हाइट टायगर मध्ये गरिबी, धर्म, राजकारण आणि भ्रष्टाचारावर भाष्य केलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Hritik Roshan, Movie review, Priyanka chopra, Rajkumar rao