KGF Chapter 2 ची तारीख जाहीर झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. सकाळपासूनच सगळे चाहते तारीख जाहीर होण्याची वाट पहात होते. संजय दत्तने याआधीच सकाळी ट्वीट करत लिहिलं होतं की,’वचन पाळले जाणार. आज संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी KGF Chapter 2 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल.”Mark The Date
History Gonna Repeat Or History Gonna Creat#KGFChapter2#KGFChapter2ReleaseDate#KGFChapter2onJuly16 pic.twitter.com/0fTzyJQSJO — KGF : Chapter 2 (@KGFChapter2) January 29, 2021
केजीएफ चॅप्टर 1 (KGF Chapter 1) या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला कन्नड अभिनेता यशच्या 34व्या वाढदिवशी या चित्रपटाच्या सिक्वेलचा टीझर रिलीज करण्यात आला होता. रिलिजनंतर आतापर्यंत या व्हिडिओला 16 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ह्या चित्रपटात यशसोबतच संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांनीही या चित्रपटात भूमिका साकारलेल्या दिसत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात रवीना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तिची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.संजय दत्त हातात तलवार घेऊन पाठमोरा उभा दिसतोय. या 2 मिनिटं 16 सेंकंदांच्या टिझरने अनेक चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.The promise will be kept!#KGFChapter2 release date announcement today at 6.32pm.@TheNameIsYash @prashanth_neel @VKiragandur @hombalefilms @TandonRaveena @SrinidhiShetty7 @prakashraaj @BasrurRavi @bhuvangowda84 @excelmovies @VaaraahiCC @PrithvirajProd pic.twitter.com/p5plTqlmJ5
— Sanjay Dutt (@duttsanjay) January 29, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Sanjay dutt