मुंबई, 22 मे: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या 'सिटाडेल' (Citadel) या आगामी वेब सिरीजच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेली प्रियांका शुटींगचे अनेक फोटो शेअर असते. काही दिवसांआधी तिने एक फोटो शेअर केला होता ज्यात ती जखमी अवस्थेत दिसत होती. तिच्या त्या फोटोची देखील बरीच चर्चा झाली होती. ती चर्चा थांबत नाही तर पुन्हा प्रियांकाच्या नव्या पोस्टची चर्चा रंगली आहे. प्रियांकाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती एका मॉर्डन गाडीत बसल्याचं दिसत आहे. प्रियांकाची ही पोस्ट आणि गाडी तिच्यासाठी फारचं खास आहे. कारण ही गाडी तिला नवरा निक जोनस ह्याने गिफ्ट केली आहे. त्यामुळे प्रियांका सध्या नवऱ्यावर प्रचंड खुश झाली असून तिने निकवरील प्रेम आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं आहे.
प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका कुल गाडीत बसलेली दिसत आहे. त्या गाडीवर मिसेस जोनस असं ठळक अक्षरात लिहीलं आहे. सिल्वर ग्रे कलरची ही गाडी असून प्रियांकाने देखील तसेच मॅचिंग आऊटफिट्स घातले आहेत. तर ब्लॅक सनग्लासेसमध्ये प्रियांका स्टाइलमध्ये गाडी चालवताना दिसत आहे.
निकने थेट प्रियांकाच्या शुटींग सेटवरच हे सप्राइज गिफ्ट पाठवलं. नवऱ्याने गिफ्ट केलेल्या गाडीत बसलेली प्रियांका फारच आनंदी दिसत असून तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये निक जोनसचं कौतुक करत 'तु बेस्ट नवरा आहेस', असं म्हटलंय. प्रियांकाने लिहिलेय, 'नाऊ दॅट्स अ राईड, मला सतत मदत करण्यासाठी थॅक्यू निक जोनस. तु बेस्ट नवरा आहेस'.
हेही वाचा - Suhana Khan B'day: 22 वर्षाची झाली शाहरुखची लेक, आई गौरीने शेअर केला सुहानाचा UNSEEN PHOTO
View this post on Instagram
प्रियांका निक यांच्यात फार उत्तम बॉडिंग आणि एकमेकांवर खूप प्रेम असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. यावेळी ही निकने प्रियांकाला व्यवस्थित शुटींगला जाता यावं यासाठी नवी गाडी खरेदी करुन दिली आहे. प्रियांकाला शुटींग सेटवर पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी निकने ही जबरदस्त गाडी प्रियांकाला गिफ्ट केली आहे.
जानेवारी महिन्याच प्रियांका आणि निक सरोगसीच्या माध्यमातून आई वडिल झाले. त्यांना मुलगी झाली. तिचं नाव मालती असं ठेवलं असून मालती 4 महिन्यांनी हॉस्पिटलमधून घरी आहे. मदर्स डेच्या दिवशी प्रियांकाने मुलीसोबतचा फॅमिली फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Nick jonas, Priyanka chopra