मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Suhana Khan B'day: 22 वर्षाची झाली शाहरुखची लेक, आई गौरीने शेअर केला सुहानाचा UNSEEN PHOTO

Suhana Khan B'day: 22 वर्षाची झाली शाहरुखची लेक, आई गौरीने शेअर केला सुहानाचा UNSEEN PHOTO

Happy Birthday Suhana Khan: बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची लेक  (Shahrukh Khan & Gauri Khan's Daughter) सुहाना खानसाठी   (Suhana Khan Birthday)  आजचा दिवस खास आहे. 'द आर्चीज'  (The Archies)  मधून सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज असणारी सुहाना आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 मे- बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची लेक  (Shahrukh Khan & Gauri Khan's Daughter) सुहाना खानसाठी   (Suhana Khan Birthday)  आजचा दिवस खास आहे. 'द आर्चीज'  (The Archies)  मधून सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज असणारी सुहाना आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या मुलीचा हा खास दिवस आई कशी विसरु शकते? म्हणूनच, गौरी खानने सुहानाचा एक अनसीन फोटो शेअर करत आपल्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहाना खान ही बॉलिवूडच्या अशा स्टारकिड्स पैकी एक आहे, ज्यांची बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच मोठी फॅन फॉलोईंग आहे. चाहते तिच्यावर प्रचंड प्रेम करतात आणि आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या सुहाना खानला तिची आई गौरी खानने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर सेलेब्सनेही शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केलं आहे.

गौरी खानने आल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुहानाचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'बर्थडे गर्ल'. यासोबतच तिने किसिंग इमोजीही शेअर केले आहेत. सुहानाचा हा कधीही न पाहिलेला फोटो पाहून सोशल मीडियावर चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत.सुहानाच्या प्रत्येक फोटोला चाहते अशीच भरभरुन दाद देत असतात. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

गौरीने मध्यरात्री ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते सतत कमेंट करत आहेत आणि सुहानाला शुभेच्छा देत आहेत. श्वेता बच्चन, फराह खान मनीष मल्होत्रापासून ते करण जोहर आणि नेहा धुपियापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत.तर सुहानानेसुद्धा प्रेमळ रिप्लाय दिला आहे. करिअरबाबत सांगायचं तर सुहाना खान लवकरच जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे. जो 2023 मध्ये OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील या चित्रपटातून पदार्पण करणार आहेत.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Shahrukh khan, Suhana khan