मुंबई, 09 मे : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत राधिकानं शेतकरी फंडासाठी जमा केलेले कोट्यवधी पैसे चोरीला गेले. राधिकानं शेतकरी फंडासाठी आणलेले 35 कोटी गुरू घेऊन पळून जातो. सगळ्यांसमोर राधिका तोंडावर आपटते. शेतकरी तर राधिकानंच पैसे चोरले असल्याचा आरोप करतात. राधिका उन्मळून पडते. राधिकाच्या घरातले तर तिच्या बाजूनंच उभे राहतायत. गुरू सगळं करून नामानिराळा राहिलाय. त्याच्या वडिलांनाच त्याच्यावर संशय आलाय. ते त्याला थोबाडीत मारून तूच पैसे चोरले असंही ते म्हणतात. गुरूनं पैशाची बॅग केडीच्या घरी पोचवलीय. आपल्यावर संशय येऊ नये असा तो वागतोय. जिवलगा : काव्याला परत मिळवण्यासाठी विश्वासनं घेतला ‘हा’ निर्णय इकडे शनाया आणि तिची आई ते 35 कोटी घेऊन पळायचा प्लॅन आखतायत. आता पुढच्या भागात हेच नाट्य रंगणार आहे. राधिका पोलिसांची मदत घेते. गुरूची चोरी पकडली जाणार आहे आणि त्यासाठी 19 मे रोजी महाएपिसोड ठेवला गेलाय. तुझ्यात जीव रंगला : पाठकबाईंच्या लाडक्या लाडूची ही कामगिरी पाहिलीत का? शनाया, राधिका, गुरू या व्यक्तिरेखांचा निर्माता आहे अभिजीत गुरू. तो ही मालिका लिहितोय. अभिजीत म्हणाला, ‘सुरुवातीला झी मराठीनं आम्हाला संकल्पना सांगितली होती. पती,पत्नी और वो. या विषयावर बरेच सिनेमे आलेत, गेला माधव कुणीकडेसारखी नाटकं आलीयत. पण आम्हाला ही मालिका इमोशनल करायची नव्हती. एन्टरटेनिंग करायची होती.’ अभिनेता इरफान खान झाला भावुक, माध्यमांना लिहिलं ‘हे’ पत्र अभिजीत पुढे म्हणाला, ’ पुरुषाची एक जात असते. बायको कितीही छान असली तरी काही दिवसांनी त्याला ती रुटिन वाटू शकते. त्याला स्पाइस हवा असतो. असे पुरुष बरेच असतात. तेच आम्ही मालिकेत आणलंय.’ शनायाची निर्मिती कशी झाली, याबद्दल अभिजीत खूप इंटरेस्टिंग सांगत होता. तो म्हणाला, ‘शनायासारख्या मुली बऱ्याचदा काॅर्पोरेटमध्ये दिसतात. त्या खूप बालिश असतात. सेल्फी काढणं, नेलपेंट लावणं यातच रमतात. अशा मुली नेहमीच कुठेतरी बघितल्यासारख्या वाटतात. ’ अभिजीतनं शनाया यातूनच तयार केली. दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.