तुझ्यात जीव रंगला मालिकेत पाठकबाई, राणादाप्रमाणे त्यांचा लाडूही लोकप्रिय झालाय. लाडू याचं खरं नाव राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहे. लाडूचं एक कसब सगळ्यांच्या समोर आलंय. लाडू चक्क उसाचा रस काढतोय. पाठकबाईंच्या लाडक्या लाडूच्या अभिनयाचं कौतुक नेहमीच होतं. पण आता त्याचं हे कसब पाहून सगळेच अवाक झालेत. या मालिकेत सध्या समज गैरसमजाचे खेळ सुरू आहेत. त्यात लाडूची भूमिका प्रेक्षकांना गंमत आणते. लाडूला या मालिकेत 1 वर्ष पूर्ण झालंय. केक कापून लाडूचं सेलिब्रेशन सेटवर झालं.