अभिनेता इरफान खान झाला भावुक, माध्यमांना लिहिलं 'हे' पत्र

अभिनेता इरफान खान झाला भावुक, माध्यमांना लिहिलं 'हे' पत्र

इरफाननं काही दिवसांपूर्वीच, त्याचा आगामी सिनेमा 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे : बॉलिवूड अभिनेता इरफान खान कॅन्सरवर उपचार घेऊन काही दिवसांपूर्वीच भारतात परतला असून त्यानं आता त्याचा आगामी सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. त्यानंतर नुकतीच इरफाननं मीडियासाठी एक पत्र लिहिलं असून त्या पत्रात त्यानं एक भावुक कविता लिहिली आहे. इरफाननं लिहिलं, 'मागच्या काही महिन्यांपासून माझी तब्बेत सुधारत आहे. ज्या वेळी तुम्ही एखाद्या आजारातून हळुहळू बरे होत असता तेव्हा तुम्ही आयुष्याचा सामना करण्यासाठी तुमच्या थकव्याशी लढत असता. तुमची काळजी मी समजू शकतो. मला माझ्याबद्दल बोलायला आणि माझा हा कठीण प्रवास सर्वांपर्यंत पोहचवायला मदत केलीत. मात्र मी अजूनही स्वतःला शोधत आहे. एक एक पाऊल पुढे टाकत आहे आणि प्रयत्न करत आहे की, तब्बेतीतील सुधारणा आणि माझं काम एकत्रच होईल.'

 

View this post on Instagram

 

Yogi aur Jaya ko pyaar dene ke liye dhanyawad 🙏👍

A post shared by Irrfan (@irrfan) on

इरफाननं पुढे लिहिलं, तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी मौल्यवान आहेत. ज्याप्रकारे तुम्ही मला या आजारातून बाहेर पडायला मदत केलीत. माझ्या खासगी आयुष्याचा सन्मात केलात त्याबद्दल मी आभारी आहे. हे प्रेम, धीर, काळजी आणि आपलेपणासाठी धन्यवाद. या भावुक मेसेजसोबतच इरफाननं आपल्या पत्रात प्रसिद्ध लेखक Rikle यांच्या काही ओळी लिहिल्या -

"I feel an urge to share with you something. I live my life in widening rings which spread over earth and sky.

I may not ever complete the last one,

but that is what I will try. I circle around God's primordial tower, and I circle ten thousand years long; And I still don't know if I'm a falcon, a storm, or an unfinished song"

'मला अद्याप माहित नाही की, मी कोण आहे, मी ससाणा आहे... मी वादळ आहे... की, मग मी एक न संपणारं गाणं आहे...' अशा आशयाच्या या कवितेतून इरफाननं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इरफाननं काही दिवसांपूर्वीच, त्याचा आगामी सिनेमा 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमात इरफानसोबत अभिनेत्री करीना कपूर आणि राधिका मदन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करीना या सिनेमात एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असून राधिका मदन इरफानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.

कडक उन्हाळ्यात तुम्हीही ट्राय करू शकता या बॉलिवूड अभिनेत्रींसारखी 'कुल फॅशन'

अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

आलिया-रणबीरच्या 'Love Story'मध्ये नवा ट्विस्ट, लग्नाबाबत आई म्हणाली...

First published: May 9, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading