जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुमचं असं करायचं धाडसं कसं काय झालं?' ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील 'त्या' सीनवर नेटकरी संतापले

'तुमचं असं करायचं धाडसं कसं काय झालं?' ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील 'त्या' सीनवर नेटकरी संतापले

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील 'त्या' सीनवर नेटकरी संतापले

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील 'त्या' सीनवर नेटकरी संतापले

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वच प्रेक्षकांना आणि चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. पण अशातच चित्रपटातील एक सीन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 जुलै- ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वच प्रेक्षकांना आणि चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. गेल्या एका वर्षांपासून करण जोहरच्या या अफलातून चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दोन वर्षांपासून या चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यानंतर या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. त्याच्या टीझरलाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळला होता. त्यानंतर अरिजीत सिंगच्या आवाजातील ‘तू क्या मिले’ हे गाणंही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली असून आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे की कधी एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. करण जोहरच्या करिअरला यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं हा चित्रपट करण जोहरसाठी खास आहे. त्यामुळे करण जोहरच्या फॅन्सना या चित्रपटाची विशेष उत्सुकता लागून राहिली आहे. पण अशातच चित्रपटातील एक सीन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यावरून नेटकऱ्यांनी करणची चांगलीच शाळा घेतली आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील एका सीनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. ट्रेलरमध्ये हा सीन पाहायला मिळत आहे. या सीनमध्ये रॉकी (रणवीर सिंह) 3 महिन्यांसाठी रानी (आलिया भट्ट)च्या घरी जातो. तेव्हा त्याचे लक्ष रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे फोटोकडे जाते आणि तो त्यांना रानीचे आजोबा म्हणून त्यांचा पाया पडतं असतो. हा सीन विनोदी शैलीतून दाखवण्यात आला आहे. हेच नेटकऱ्यांना आता खटकलं आहे. यावरून नेटकरी करणवर भडकले आहेत. अनेकांनी कमेंट करत त्याची शाळा घेतली आहे. वाचा- ‘अशिक्षित नेते आपल्यावर राज्य…’ राजकारणाविषयी काजोलचं ‘ते’ विधान चर्चेत एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “बॉलीवूड कधीच भूतकाळातून शिकणार नाही. रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान कसा करू शकता? भारताच्या इतिहासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अशा व्यक्तीचा अपमान हा सहन करू शकत नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “एखाद्या महान व्यक्तीचा अनादर करणे अजिबात मान्य नाही. तुम्हाला रवींद्रनाथ टागोर यांच्यावर विनोद करायचं धाडसं कसं काय झालं?” तसेच तिसऱ्यानं लिहिलं की, “ट्रेलर मजेशीर आहे, पण यातील एक सीन पाहून आश्चर्यचकीत झालो. पण चांगल्या उद्देशाने नाही.” अशा असंख्य कमेंट नेटकऱ्यांनी यावर केल्या आहेत.

जाहिरात

कुटुंबात असणारे अनेक हवेदावे, प्रेम, भांडणं, विनोद, मजामस्ती, संघर्ष, दुश्मनी या सर्वांचे दर्शन या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे. त्याचसोबत आलिया आणि रणवीर सिंगचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतो आहे. डान्स, ड्रामा, बिनधास्त डायलॉग्ज, गाणी, रोमान्स आणि रिलेशनशिप, प्रेम याचा संगमही या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. आलिया आणि रणवीर सिंग म्हणजेच रॉकी आणि रानी हे दोघंही 3 महिने एकमेकांच्या घरी आपल्या परिवाराला समजून घेण्यासाठी राहण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे या चित्रपटाला एक वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे. आता यामुळे नक्की काय काय या चित्रपटातून पाहायला मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच एका सीनमुळे चित्रपट वादात सापडला आहे. आता करण यावर काय अॅक्शन घेणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

News18

आलिया भट्ट, रणवीर सिंग, जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझामी अशी मल्टिस्टारर ही फिल्म प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं देखील उत्सुकतेचे ठऱणार आहे. येत्या 28 जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात