मुंबई, 15 जून :महेंद्रसिंग धोनीची व्यक्तीरेखा साकारणारा सुशांत सिंह राजपूत याने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला होता. सुशांतने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.
सुशांतचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. रविवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. यात सुशांतचा मृत्यू हा गळफास लागल्यामुळेच झाला असं अहवालात स्पष्ट झालं आहे. सुशांतने आपल्या सिनेकरिअरमध्ये जास्त प्रमाणात सिनेमे साकारले नव्हते. पण, तो एक यशस्वी अभिनेता म्हणून समोर आला होता. त्यानं टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोणी यांच्या कारकिर्दीवर एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात माहीची मुख्य भूमिका साकारली होती.
सुशांतच्या सिनेमातील अभिनेत्रीला कोसळलं रडू, प्रदर्शनाआधीच घेतला जगाचा निरोप
'एमएस धोनी' सिनेमाने 220 कोटींची कमाई केली होती. या सिनेमामुळे सुशांतच्या अभिनयाचा ठसा उमटला होता. सुशांत हा चांगला अभिनेता तर होता, त्यासोबत तो एक उत्तम डान्सर आणि अनेक रिअॅलिटी शोमध्ये त्याने अँकरिंगही केलं होतं.
सुशांत एका सिनेमासाठी 5 ते 7 कोटी मानधन घेत होता. तर जाहिरातीसाठी तो 1 कोटी रुपये घेत होता. त्याने रिअल इस्टेट प्रॉपर्टी क्षेत्रातही गुंतवणूक केली होती.
त्याची एकूण संपत्तीही 80 लाख डॉलर म्हणजे 60 कोटी पेक्षा जास्त होती. एमएस धोनी सिनेमाने 220 कोटींची कमाई केली होती. सुशांतने सिनेमे,जाहिराती आणि गुंतवणुकीतून कोट्यवधीची संपत्ती जमवली होती.
सुशांतचा 'तो' फोटो पोस्ट करत असाल तर सावधान! होऊ शकते कारवाई
बॉलिवूडच्या इतर सेलिब्रेटीप्रमाणेच सुशांत हा वांद्रे येथील आलिशान घरात राहत होता. त्याला कार आणि स्पोर्ट्स बाईकचा छंद होता. त्यामुळे त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या होत्या. यात मसेराटी क्वाटरोपोर्ते, लँड रोव्हर रेंज रोवर एसयूवी, बीएमडब्ल्यू के 1300 आर स्पोर्ट बाईक आणि इतर गाड्या होत्या.
सुशांत हा मुळचा बिहारचा राहणारा होता. त्याचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी पटना इथं झाला होता. सुशांतची इंजीनिअर व्हायची इच्छा होती. अभ्यासातही तो हुशार होता. सुशांतने सन 2003 मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया सातवे रॅकिंग प्राप्त केले होते. नंतर सुशांत सिंहने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये ( दिल्ली टेक्निकल यूनिव्हर्सिटी) मॅकॅनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास सुरू केला होता. मात्र, कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांतच त्यानं शिक्षण अर्ध्यात सोडलं आणि अॅक्टिंग शुरू केली होती. नंतर सुशांतनं अल्पावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput