मुंबई, 31 डिसेंबर : टीव्हीची सुपरहिट मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मराठी नंतर हिंदी टीव्ही मालिका ‘मे आय कम इन मॅडम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नेहा तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंहशी लग्न करत आहे. दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने मान्य केलं. याशिवाय शार्दुल सिनेसृष्टीतील नसल्याचंही नेहाने याआधी सांगितलं. नववर्षाच्या सुरुवातीला नेहा महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं होतं. त्याप्रमाणे आता तिच्या लग्नाच्या आधीच्या विधी तिच्या मुंबईतल्या घरी सुरू झाल्या आहेत. याचे काही फोटो समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये नेहा मराठमोळ्या लुकमध्ये दिसत आहे. ऑफ व्हाइट-रेड रंगाच्या कॉम्बिनेशनच्या साडीमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे. आई-वडिलांसोबत बसून ती गृहमुख पुजा करताना दिसत आहे.
रेल्वे स्टेशनवरील तरुणाच्या गाण्याने रानू मंडललाही टाकलं मागे, VIDEO VIRAL
दुसऱ्या एका फोटोमध्ये गुरुजींनी सांगितल्याप्रमाणं पूजा करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ती खूप खूश असल्याचं सांगून जात आहे.
नेहा मागच्या वर्षी बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या लग्नाची घोषणा केली होती. मी माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्न करणार असल्याचं तिनं यावेळी सांगितलं होतं. नेहा म्हणाली, या सुंदर कुटुंबाची सदस्य होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर क्षण आहे असं देखिल तिनं सांगितलं.
टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण…
नेहानं मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिनं नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. नेहा मराठमोळ्या पद्धतीनंच लग्न करणार आहे. सर्व विधी मराठी पद्धतीने होतील. लग्नाच्या मुख्य विधींना मी साडी नेसण्याचा विचार करत आहे. असं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नेहानं सांगितलं होतं.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं समजताच बिग बींच्या मनात आली शंका, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.