चंदीगढ, 31 डिसेंबर : यंदाचं संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंनी गाजवलं. त्यात करुन सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या त्या पश्चिम बंगालच्या रानू मंडल. राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गातानाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. त्यानंतर आता वर्षाच्या अखेरीस असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तरुणाचा आवाज ऐकल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ चंदीगढमधील एका रेल्वे स्टेशनवरील असल्याचं म्हटलं जात आहे. एका फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये एक तरुण अक्षय कुमारचं नुकतंच रिलीज झालेलं ‘फिलहाल’ हे अल्बम सॉन्ग गाताना दिसत आहे. गाण्याची कोणतही शिक्षण न घेतलेल्या या तरुणाचा आवाज सर्वाना मोहात पाडतो. त्यानं अगदी हुबेहुब हे गाणं गायलं आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं समजताच बिग बींच्या मनात आली शंका, पाहा VIDEO
हा व्हिडीओ श्रेया बॅनर्जी नावाच्या एका तरुणीनं तिच्या फेसबुकवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये या तरुणाचं नाव रोहित असल्याचं तिनं सांगितलं आहे. तसेच हा तरुण मथुरा येथील राहणारा आहे असंही तिनं नमूद केलं आहे. दरम्यान रानू मंडल यांच्यानंतर देशभरातून असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. मात्र त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. थोडक्यात काय तर हा सर्व नशिबाचा भाग असतो असं म्हणायला हरकत नाही. पण या तरुणाचा आवाज खरंच कौतुकास पात्र आहे. हे मूळ गाणं B praak यानं गायलं आहे. हे गाणं अक्षय कुमार आणि नुपूर सेनन यांच्यावर चित्रीत करण्यात आलं असून या गाण्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला होता. सर्जरी की मेकअपची जादू? कसा लपवला दीपिका पदुकोणने RK टॅटू? ‘आम्ही हरलो…’, कुशल पंजाबीच्या निधनानंतर एकता कपूर भावुक