जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं समजताच बिग बींच्या मनात आली शंका, पाहा VIDEO

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं समजताच बिग बींच्या मनात आली शंका, पाहा VIDEO

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं समजताच बिग बींच्या मनात आली शंका, पाहा VIDEO

चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार बिग बी अमिताभ बच्चन यांना देण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार बिग बी अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार बिग बींना दिला गेला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चनही उपस्थित होता. यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्तीची शंका मनात आल्याचं मत भाषणात व्यक्त केलं. बिग बींना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला प्रकृती ठिक नसल्यानं उपस्थित राहता आलं नव्हतं. केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरस्कार आणि पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे आधी जाहीर केली होती. बिग बींना मुख्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता न आल्यानं त्यांना 29 डिसेंबरला हा पुरस्कार देण्यात येईल असं केंद्र सरकारने सांगितलं होतं. त्यानुसार रविवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला. दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले की, दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी मला पात्र समजले त्याबद्दल भारत सरकार आणि निवड समितीचे खूप आभार. आई वडिलांचे आशीर्वाद आणि भारतीय चाहत्यांच्या प्रेमामुळे काम करता आलं. चित्रपटांतून काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा मनात एक शंका आली. हा पुरस्कार कशाचे संकेत आहेत. तुम्ही आता खूप काम केलं आता घरी बसून विश्रांती घ्या? असं तर नाही ना. पण माझं अजुन काम राहिलं आहे आणि ते पूर्ण करायचं. पुढेही मला काम करत रहायचं आहे.

जाहिरात

दादासाहेब फाळके हा पुरस्कार धुंडीराज गोविंद फाळके यांच्या नावाने दिला जातो. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटलं जातं. हा पुरस्कार 1969 पासून देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप एक सुवर्ण कमळ, एक शाल आणि दहा लाख रुपये असं असतं. बिग बी अमिताभ बच्चन यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात