Home /News /entertainment /

Neha Pendse news: बापरे! नेहा पेंडसे आता राहते 'इकडे', अतुल गोगावले काय म्हणले पाहा!

Neha Pendse news: बापरे! नेहा पेंडसे आता राहते 'इकडे', अतुल गोगावले काय म्हणले पाहा!

मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख असणारी नेहा पेंडसे (Nehha Pendse) सध्या तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे बरीच चर्चेत येत आहे.

  मुंबई 15 जून: नेहा पेंडसे (Nehha Pendse) ही अभिनेत्री सध्या बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. नेहा एक यशस्वी अभिनेत्री आणि यशस्वी निर्माती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. नेहा सोशल मीडियावर (Neha Pendse Instagram) बरीच ऍक्टिव्ह असते. तिच्या घरी शेपूटवाले अनेक मित्र असल्याने तिच्या पेट्स चे नवनवीन अपडेट्स सुद्धा ती शेअर करत असते. पण नेहाच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टची जरा बरीच चर्चा हातानं दिसत आहे. नेहा सध्या कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची सगळीकडे उत्सुकता लागून राहिली आहे. नेहाने याबद्दल अजून तरी काही घोषणा केली नाहीये. ती सध्या नव्यानव्या लोकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिने नुकत्याच केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.(Neha Pendse new instagram post) एक कमाल फोटो शेअर करत नेहाने त्याला कॅप्शन दिली आहे, “I live in joggers“. या फोटोमध्ये नेहा कम्फर्टेबल जॉगर्स, कूल ब्लॅक टॉप आणि व्हाईट जॅकेटमध्ये दिसत आहे. असे कम्फर्टेबल कपडे घालायला तिला केव्हाही आवडतं. सध्या तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे पजामा लुक viral होताना दिसतात. अशातच तिच्या हा पोस्टचं आणि लुकच कौतुक होताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

  यावर मात्र अजय-अतुल या संगीतकार जोडीतील अतुल गोगावले यांनी भन्नाट कमेंट केली आहे. ते असं म्हणतात, “आम्हाला वाटत होतं तू इतके दिवस मुंबईत राहत आहेस. किती खोटारडी आहेस” . नेहाच्या पोस्टमध्ये तिने असं स्पष्ट केलं आहे की ती जॉगर्समध्ये राहते अर्थात तिला जॉगर्स परिधान करायला आवडतात. यावर संधी न दवडता शाब्दिक कोटी करत अतुल गोगावले आणि चाहत्याना आकर्षित केलं आहे. या पोस्टवर अमृता खानविलकरने सुद्धा खास कमेंट केली आहे. “नजर चेहऱ्यावरून हटली तर जॉगर्सकडे बघेन ना!” अशा थाटात तिने नेहाचं कौतुक केल्याचं दिसत आहे. हे ही वाचा- '...आणि मग पहिला रेडिओ घरात आणला '' केदार शिंदेंनी सांगितला शाहिरांच्या पत्नीच्या हट्टाचा तो किस्सा नेहा कायमच तिच्या वेगवेगळ्या लुकमुळे चर्चेत येत असते. अगदी साडीपासून ते वेस्टर्न कपड्यांपर्यंत सगळं तिच्यावर शोभून दिसतं. तिचे चाहते सुद्धा तिच्या या लुकचं बरंच कौतुक करताना दिसतात.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Ajay atul, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या