मुंबई, 15 जून- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक म्हणून दिग्दर्शक केदार शिंदे ( Kedar Shinde) जातं. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी नाटकं. हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या मालिका ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा सिनेमांचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या तिन्ही क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे केदार शिंदे सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतात. आता त्यांची नवी पोस्ट चर्चेत आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांच्या दिग्दर्शनामधून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमठविला आहे. सध्या ते आपल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट लोकप्रिय कलाकार शाहीर साबळे यांच्यावर आधारित आहे. दरम्यान ते आपल्या एका अनोख्या पोस्टमुळे सध्या चर्चेत आहेत. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पाहूया काय आहे नेमकी पोस्ट. केदार शिंदे पोस्ट- ‘‘अरे संसार संसार….मुंबईत शाहीरांनी बिर्हाड थाटल..आता इथे जम बसवण्यासाठी आहोरात्र कष्ट करण्याची गरज होती..आता कष्ट करायचे ते कलेच्या क्षेत्रातच हे त्यांनी आणि भानुमतीने पक्क ठरवल होत..त्याकाळी एच.एम.व्हि.कंपनी मराठी गीतांच्या रेकॉर्ड्स काढत असे..रेडीयोस्टेशन वरुनही लाईव्ह गाणी सादर होत असत पण रेडीयोस्टेशनला आवाजाची परीक्षा द्यावी लागे..शाहीर या परीक्षेत पास झाले आणि त्यांची गाणी रेडीयोवर येऊ लागली..
महाराष्ट्रातील लोकसंगीत रेकॉर्ड व्हाव ही शाहीरांची इच्छा होतीच पण भानुमतीही त्यांच्या आवाजाच्या धाटणीची गीतरचना करु लागली होती..शाहीरांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स नीघू लागल्या आणि रेडियोवर वाजायलाही लागल्या पण मुंबईत बस्तान बसवताना आणि चार मुलांचा सांभाळ करत कुटूंबाचा खर्च भागवताना चैनीच्या वस्तू घेण केवळ अशक्य होत पण आता कमीत कमी एक रेडियोतरी घरात असावा असा हट्टच भानुमतीने धरला..शाहीरांनाही त्याची गरज भासत होतीच आणि मग खर्चात तडजोड करत पहिला रेडियो घरात आला.. (हे वाचा: राज ठाकरेंच्या वाढदिवसाला केदार शिंदेंची दोन शब्दाची पोस्ट ठरतेय लक्षवेधी, काय आहे त्यात खास? ) ‘‘रेडियो पाहून भानुमती हरखून गेली..तीच्या संसारातली पहिली चैनीची गोष्ट होती ती..शाहीरांनाही रेडियोसह भानुमतीचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही..ओळखीच्या फोटोग्राफर मीत्राकडून क्यामेरा आणून त्यांनी भानुमतीची रेडियोसहीत ही छबी आपल्या आठवणीत बंदिस्त करुन ठेवली.. लेखिका’’