मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Neha Kakkar: एअरपोर्टवर घडलं असं काही की नेहा कक्कर धावली मदतीला! IIFA साठी निघाली होती दुबईला

Neha Kakkar: एअरपोर्टवर घडलं असं काही की नेहा कक्कर धावली मदतीला! IIFA साठी निघाली होती दुबईला

नेहा कक्कर (neha kakkar) चे लाईफ अपडेट जाणून घ्यायला अनेकजण उत्सुक असतात. पण नेहा सध्या एका भलत्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.  काय आहे हे नेमकं कारण?

नेहा कक्कर (neha kakkar) चे लाईफ अपडेट जाणून घ्यायला अनेकजण उत्सुक असतात. पण नेहा सध्या एका भलत्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. काय आहे हे नेमकं कारण?

नेहा कक्कर (neha kakkar) चे लाईफ अपडेट जाणून घ्यायला अनेकजण उत्सुक असतात. पण नेहा सध्या एका भलत्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. काय आहे हे नेमकं कारण?

मुंबई 1 जून: बॉलिवूडचा बहुचर्चित IIFA अवॉर्ड सोहळा (IIFA Awards) यावर्षी दिमाखात दुबईमध्ये पार पडणार आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सची दुबईला जाण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. मोठमोठ्या स्टार्सचे एअरपोर्ट लुक सुद्धा हळूहळू समोर येऊ लागले आहेत. यावर्षी iifa ला बऱ्याच मोठ्या आणि चर्चित मंडळींची मांदियाळी असणार आहे. मराठीतील सुद्धा बरीच मंडळी दुबईच्या दिशेने निघाली आहेत.

यातच एक नाव प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचं जोडलं पाहिजे. नेहा आणि तिचा पती रोहन जोडीने iffa सोहळ्याचा आनंद लुटायला सज्ज झाले आहेत. मात्र दुबईला जात असताना एअरपोर्टवर असं काही घडलं की नेहा पटकन मदतीसाठी धावली

नक्की काय घडलं एअरपोर्टवर?

नेहा आणि रोहनची (Neha and Rohan)गाडी एअरपोर्टवर आल्यावर त्यांचा एअरपोर्ट लुक कॅप्चर करायला पाप्पाराझिने गर्दी केली. अनेक कॅमेरा नेहा आणि रोहनवर रोखले गेले होते. त्यातच एका कॅमेरामनचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्याला मदत करायला नेहा आणि रोहन सुद्धा धावले. हा सगळा प्रकार एका व्हिडिओमध्ये कैद झाला असून Viral Bhayani च्या इन्स्टाग्राम पेजवरून याबद्दल विडिओ शेअर करण्यात आला.

त्याला लागलं नाहीये ना याबद्दल नेहाने चौकशी सुद्धा केल्याचं या विडिओमध्ये कळत आहे. नेहाच्या या प्रसांगावधानाचं कौतुक होताना दिसत आहे. कमेंट सेक्शनमध्ये तर नेहाच्या चाहत्यांनी तिच्या या वागण्याबद्दल तिला प्रचंड डोक्यावर घेतलं आहे. तिने पटकन केलेली मदत, तिचा खरा आणि सकारात्मक स्वभाव सगळ्यांना मनापासून आवडतो आहे.

हे ही वाचा-सगळ्यांची झालीय बत्ती गुल कारण 'टाईमपास 3'च्या टिझरला 24 तासात 1M व्ह्यूज

अनेकांनी तर स्टारकिड्स पेक्षा नेहा किती चांगली आहे अशा कमेंट करून स्टारकिड्सना चक्क धारेवर धरलं आहे. दयाळूपणा आणि मानवता या तिच्या गुणांचं सुद्धा कौतुक होताना दिसत आहे. नेहा ही कायमच तिच्या फॅन्ससाठी खास राहिली आहे. तिच्या फॅन्सची फळी तोडणं जवळपास अभेद्य आहे. तिला अनेकजण क्युट गोंडस अशी बाहुली सुद्धा म्हणतात. नेहा बऱ्याच कॉंट्रोव्हरशियल गोष्टींचा भाग असताना सुद्धा फॅन्सनी तिची बाजू घेतली होती.

First published:

Tags: Airport, Bollywood News, Singer neha kakkar