मुंबई, 21 डिसेंबर : आपल्या गोड आवाजानं सर्वांना वेड लावणारी गायिका नेहा कक्कर मागच्या काही दिवसांपासून इंडियन आयडॉलच्या 11 व्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. मात्र याशिवाय नेहा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असते. ती म्हणजे मागच्या वर्षी झालेला तिचा ब्रेकअप. मागच्या वर्षी ब्रेकअप झाल्यानंतर नेहा बराच काळ डिप्रेशनमध्ये होती. 4 वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तुटलेल्या नेहाला वर्षाच्या सरतेशेवटी पुन्हा एकदा आपल्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण आली. इतकेच नाही तर नेहानं त्याच्यासाठी गाणंही गायलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इंडियन आयडॉल सीझन 11 ची परीक्षक आणि बॉलिवूड सिंगर नेहा कक्करचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये नेहा तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलताना दिसत आहे. एवढंच नाही तर त्याच्यासाठी तिनं ‘चन्ना मेरेया’ हे गाणंही गायलं आहे. इंडियन आयडलमध्ये स्पर्धक अद्रिज घोषनं ‘ऐ दिल है मुश्किल’मधील ‘चन्ना मेरेया’ गाणं गायलं होतं. गाणं ऐकल्यावर नेहाला तिच्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण आली आणि तिनं त्याच्यासाठी हे गाणं गायलं. CAA विरोधात ट्वीट केल्यानं अभिनेता फरहान अख्तरच्या अडचणीत वाढ
Entertainment aur suroon ka quota hoga high kyunki aa rahi hai @bharti_lalli aur unke dulhe #HaarshLimbachiyaa iss weekend #ShaadiSpecial mein. Miss mat kijiye #IndianIdol11 iss Sat raat 8 baje. #IndianIdol #EkDeshEkAwaaz @iAmNehaKakkar @VishalDadlani #HimeshReshammiya pic.twitter.com/AxHlDc0Qno
— sonytv (@SonyTV) December 19, 2019
नेहाचं गाणं संपल्यावर होस्ट आदित्य नारायण तिची मस्करी करत म्हणाला, यानंतर मला फक्त एवढंच सांगायचं आहे. ‘इसमे तेरा घाटा, इनका कुछ नही जाता’ नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ती या वेळीही तिच्या बिनधास्त मूडमध्ये दिसली. इंडियन आयडॉलचा हा एपिसोड खूपच खास असणार आहे. कारण या एपिसोडमध्ये कॉमेडियन भारती सिंह हजेरी लावणार आहे. यावर्षी भारती आणि हर्षच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली. हे दोघंही या सेटवर धम्माल करताना दिसणार आहेत. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायका अरोरा दिसते HOT आणि FIT, काय आहे गुपित Year Ender 2019: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले टॉप 5 कपल्स