मुंबई, 21 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायका नवोदित कलाकारांना टक्कर देईल एवढी मादक दिसते. आज आपण तिच्या सौंदर्यावर नाही तर तिच्या फिटनेसबद्दल बोलणार आहोत. मलायकाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर प्लँक करतानाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती साइड प्लँक करताना दिसते. या फोटोत ती सर्वात कठीण अशी साइड प्लँक एक्सरसाइज अगदी सहजतेने करताना दिसत आहे. सध्या मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या फिटनेसचं भरभरून कौतुक केलं जात आहे. तिच्या या फिटनेसचं रहस्य काय… प्लँक ही एक बॉडी वेट एक्सरसाइज आहे. फिट राहण्यासाठी प्लँक एक्सरसाइज फार फायदेशीर आहे. यामुळे पोटाचे मसल्स मजबूत होतात आणि या व्यायामामुळे पाठीच्या कण्यावर आणि पार्श्वभागावर (Hips) ताण येत नाही. यामुळेच प्लँक करताना कोणतीही दुखापत होण्याचा धोका कमी असतो. नियमितपणे प्लँक केल्याने मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात आणि घाम येतो. यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते. याचमुळे दररोज किमान 10 मिनिटं प्लँक करणं आवश्यत आहे.
शरीराचं संतुलन कायम रहावं अशी इच्छा जर तुमची असेल तर प्लँक एक्सरसाइज तुमची चांगली मदत करू शकतं. कोणतीही व्यक्ती एका मिनिटापेक्षा जास्त एका पायावर उभी राहू शकत नाही. पण प्लँक केल्याने मांसपेशी मजबूत होतात. ही एक्सरसाइज केल्याने मोठ्या कालावधीसाठी शरीर संतुलित राहण्यास मदत होते. यामुळे कोणतीही व्यक्ती डोक्यावर आणि एका पायावर खूप वेळ सहज उभी राहू शकते. यामुळे खांदा, पाय, कंबर हे भाग मजबूत होतात. तसंच शरीर अधिक लवचिक होतं. स्नायूंवर येणाऱ्या ताणामुळे मोठ्याप्रमाणात अंगदुखी होते. सतत बसल्यामुळेही स्नायूंवर ताण येतो. स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी प्लँक करा. प्लँक केल्याने मेंदूही शांत होतो आणि चिंता आणि नैराश्याचा धोकाही कमी होतो. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.