बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवी नाती जुळतात आणि तुटतात. पण काही जोड्या मात्र काही सेलिब्रेटी मात्र सतत चर्चेत राहतात. किंबहुना चाहते आणि या जोड्यांमध्ये एक वेगळं नातंच तयार होतं म्हटलं तरीही वागव ठरणार नाही. अशा काही जोड्या ज्या संपूर्ण वर्षभर चर्चेत राहिल्या...
फरहान अख्तर आणि शाबानी दांडेकर ही जोडी यंदा सोशल मीडियावर फार चर्चेत राहिली. हे दोघंही नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. मात्र त्यांच्या सावर्जनिक ठिकाणी व्यक्त होणं त्यांच्या कुटुंबीयांना आवडलेलं नाही. पण तरीही या दोघांवर त्याचा फारसा फरक पडलेला दिसला नाही.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील जोडी आहे. या दोघांनी आपल्या नात्याची कबूली दिली असून ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. अर्जुन मलाइकाच्या वयात 12 वर्षांचं अंतर आहे. सध्या मलाइका 42 तर अर्जुन 33 वर्षांचा आहे. यामुळे त्यांच्या नात्याची बरीच चर्चा या वर्षभरात झाली.
बॉलिवूडमधील क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्न करतील अशा चर्चा आहेत. या दोघांनीही मागील वर्षी आपल्या नात्याची कबूली दिली होती. त्यानंतर दोघंही अनेकदा एकमेकांच्या फॅमिली सोबत वेळ घालवताना दिसतात.
वर्षाच्या सुरुवातीपासून चर्चेत आलेली जोडी होती ती म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. हे दोघंही लवकरच इम्तियाज अली यांच्या 'लव्ह आज कल 2' मध्ये दिसणार आहेत. मात्र काही दिवसांपासून यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा आहेत.
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ही जोडी यंदा विशेष चर्चेत राहिली. कारण, गॅब्रिएलासाठी अर्जुननं त्याची पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिला. इतकंच नाही तर गॅब्रिएलानं अर्जुनशी लग्न करण्याआधीच त्याच्या बाळाला जन्म दिल्यानं हे दोघं चर्चेत राहिले.