मुंबई, 13 मार्च : अभिनेत्री नेहा धुपिया सध्या ‘रोडीज रेव्हेल्यूशन’मध्ये टीम लीडर झालेली दिसत आहे. पण या शोमध्ये नेहानं एका कंटेस्टंटवर अशी काही कमेंट केली की त्यामुळे आता तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. नात्यातल्या विश्वासघातावर नेहा बिनधास्त वक्तव्य करण्याच्या नादात असं काही बोलली की तिच्या या वक्तव्याची ट्विटरवर जोरदार खिल्ली उडवली जात आहे. नेहा धुपिया सध्या ‘रोडीज रेव्हेल्यूशन’मध्ये टीम लीडर म्हणून दिसत आहे. सध्या या शोची ऑडिशन सुरू असून यामध्ये एका मुलानं सांगितलं की, त्याची गर्लफ्रेंड एकावेळी 5 मुलांना डेट करत होती आणि त्याच्यासोबत चीटिंग करत होती. यासाठी त्यानं तिच्या कानशिलात लगावली. या मुलाचं बोलणं पूर्ण झाल्यावर नेहा त्याच्यावर खूप भडकली. ‘पाच किंवा त्याहून जास्त मुलांना डेट करणं हा त्या मुलीचा स्वतःचा निर्णय असू शकतो. त्यासाठी तिच्या कानाखाली मारण्याचा तुला काहीही अधिकार नाही.’ अशा शब्दात नेहानं त्या मुलाला सुनावलं. पण तिचं हे वक्तव्य तिलाच भारी पडलं आहे. ‘वेबसीरिज गर्ल’ मिथिला पालकरच्या HOT बिकिनी लुकवर चाहते क्लिनबोल्ड!
@NehaDhupia having 5 boyfriend and it’s her choice , and the problem lies with the loyal boy !! Sasta maal fukna bandh karo dumbhead #dumb_roadies
— Burnol Baba (@panku_lucky) March 12, 2020
नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेहाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. ज्यात बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहितगी हिचाही समावेश आहे. नेहाचा हा व्हिडीओ शेअर करत पायलनं तुझ्याकडून या गोष्टीची अपेक्षा नव्हती असं म्हणत नेहाची खिल्ली उडवली आहे. ‘जब वी मेट’च्या सीनची कॉपी करताना झाला अपघात, श्वेता तिवारी जखमी
पायल रोहितगी व्यतिरिक्त इतर अनेकांनी नेहाच्या या वक्तव्यावरुन तिची खिल्ली उडवली आहे. एवढंच नाही तर यामुळे गुरुवारी संध्याकाळपासून नेहा ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आहे. अनेक युजर्सनी तिच्यावर मीम्स शेअर करत तिला नकली फेमनिस्ट असं म्हटलं आहे.
#NehaDhupia
— Yash Sharma (@imyash_15) March 12, 2020
Presenting #feminist @NehaDhupia
And not expect from you @rannvijaysingha #genderequity pic.twitter.com/HockmjsjAO
@NehaDhupia
— Rishi Raj (@rishirajsharma_) March 12, 2020
😂😂
You are epic#NehaDhupia #Roadies pic.twitter.com/m5KMLC5LJW
#NehaDhupia
— Anooj Pal (@anoojpal) March 12, 2020
Neha : if a girl is having 5 boyfriends at a time, its her choice... pic.twitter.com/Rrzt3axrrL
‘रोडीज रेव्हेल्यूशन’मध्ये नेहा एकटीच फिमेल गँग लीडर आहे. या शो व्यतिरिक्त ती काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या देवी या शॉर्टफिल्ममुळे सुद्धा चर्चेत आली होती. या शॉर्टफिल्ममध्ये 9 समदुःखी स्त्रियांची कथा मांडण्यात आली आहे. बॉलिवूडमध्येही ‘कोरोना’ची दहशत, अक्षय कुमारला बसला मोठा फटका