'लिट्ल थिंग्स' या वेब सीरिजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मिथिला पालकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
मिथिला नेहमीच इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिनं एक बिकिनी फोटो शेअर केला आहे.
मिथिला वेब सीरिज क्वीन म्हणून ओळखलं जातं. तिनं आतापर्यंत गर्ल इन द सिटी, चॉपस्टिक, लिटल थिंग्स अशा वेबसीरिजमध्ये काम केलं आहे आणि तिच्या या वेबसीरिज प्रचंड गाजल्या.
याशिवाय तिनं 2017 मध्ये अमेय वाघसोबत 'मुरंबा' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं.
फार कमी वेळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 27 वर्षीय मिथिलाचे सोशल मीडियावर तब्बल 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.