Home /News /entertainment /

'जब वी मेट'च्या सीनची कॉपी करताना झाला अपघात, श्वेता तिवारी जखमी

'जब वी मेट'च्या सीनची कॉपी करताना झाला अपघात, श्वेता तिवारी जखमी

टीव्ही मालिकेत जब वी मेट चित्रपटातील सीन रिक्रिएट करताना झालेल्या अपघातामध्ये अभिनेत्री जखमी झाली आहे.

    मुंबई, 12 मार्च : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या मेरे डॅड की दुल्हन या मालिकेत दिसते. या मालिकेच्या शूटिंगवेळी सेटवर झालेल्या अपघातात ती जखमी झाली आहे. मेरे डॅड की दुल्हनच्या शूटिंग दरम्यान श्वेताच्या हाताला भाजलं आहे. मालिकेत ती गुनीत सिक्काची भूमिका साकारत आहे. मेरे डॅड की दुल्हन मालिकेत अभिनेता फहमान खान आणि श्वेता तिवारी जब वी मेटमधील सीन करत होते. त्यावेळी चुकून श्वेताच्या हाताला भाजलं. फहमान खान या मालिकेत श्वेता तिवारीच्या मित्राची भूमिका करत आहे. सीनमध्ये श्वेता साडी आणि स्कार्फ पेटवून देत असते त्यावेळी हा अपघात घडला. जब वी मेटमध्ये गीत तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा फोटो जाळून तो फ्लश करते असा सीन आहे.  असाच सीन मालिकेत करत असताना पडद्यांना आग लागते. ही आग विझवण्याचा प्रयत्न श्वेता करते. तिचा हात यामध्ये तिचा हात भाजला. अनेकांना ती सीन चांगला वठवण्यासाठी असं करत असल्याचं वाटलं. मात्र यात तीला दुखापत केली. हे वाचा : OMG! मराठमोळी मुग्धा गोडसे करतेय स्वतःपेक्षा 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट श्वेता तिवारी अनेक मालिका आणि शोमध्येही दिसली आहे. बिग बॉसच्या 4 सीझनची ती विजेतीसुद्धा आहे. तिच्या खासगी आयुष्यातही तिने बरेच चढउतार पाहिले आहेत. राजा चौधरीपासून वेगळं झाल्यानंतर 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर अभिनवसोबतचा वाद पोलिसांपर्यंत गेला होता. हे वाचा : अरे देवा! मलायकाने हे काय घातलंय (की नाही?), VIDEO पाहून युजर्सनी केलं ट्रोल
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Actress, Shweta

    पुढील बातम्या