जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Neena Gupta: 'मी तर सार्वजनिक…' चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकल्या नीना गुप्ता; व्हिडीओ व्हायरल

Neena Gupta: 'मी तर सार्वजनिक…' चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकल्या नीना गुप्ता; व्हिडीओ व्हायरल

नीना गुप्ता

नीना गुप्ता

नीना गुप्ता त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता उत्कृष्ट अभिनय आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांनी आजवर ‘बधाई हो’ व्यतिरिक्त पंचायत, पंचायत 2 मालिका यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ही अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. त्यामुळे त्या अनेकदा चर्चेत असतात. सोशल मीडियावरही त्या खूप सक्रिय असतात. आता नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या अभिनेत्री खूप संतापलेल्या दिसत आहेत. खरं तर, गुरुवारी दिग्गज अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नीना गुप्ता यांनी नुकतीच मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये इंडिया आर्ट्स फेस्टिव्हलला भेट दिली. या फेस्टिवलमध्ये लावण्यात आलेल्या  चित्रांची त्यांनी पाहणी केली. त्यांच्या बरोबरीने अनेकजण हा फेस्टिवल बघण्यासाठी आले होते. यातीलच त्यांचा एक चाहता असावा त्याने नीना गुप्ता यांचा फोटो काढला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘लोक न विचारता फोटो काढतात, मी तर सार्वजनिक मालमत्ता आहे. ठीके काही हरकत नाही.’ अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. हेही वाचा - भाचीसोबत सलमान खान तर लेकीसोबत ऐश्वर्या; अनंत-राधिकाच्या साखरपुड्यासाठी एकत्र आले बॉलिवूडचे कलाकार नीना गुप्ता यांनी  यावर अतिशय शांतपणे प्रतिक्रिया दिली असली तरी, त्यांना न विचारता फोटो क्लिक करणे आवडत नसल्याचे त्यांच्या स्टाइलवरून स्पष्ट होत आहे. अभिनेत्रीच्या या प्रतिक्रियेनंतर अनेक चाहते आणि यूजर्स कमेंट करत आहेत. त्यापैकी एका नेटकाऱ्याने लिहिले की, कलाकारांचेही वैयक्तिक आयुष्य असते. त्याचबरोबर अनेक यूजर्स त्यांच्या लुकचे कौतुक करताना दिसले आहेत.

जाहिरात

नीना गुप्ता यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तिने आयुष्मान खुरानासोबत ‘बधाई दो’ नंतर ‘शुभ मंगल झ्यादा सावधान’मध्येही काम केले. त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ आणि ‘उंचाई’ या चित्रपटात देखील झळकल्या होत्या.

News18लोकमत
News18लोकमत

या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा, अभिनेते अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांसारखे कलाकार दिसले होते. नुकत्याच ‘वध’च्या चित्रपटात झळकल्या होत्या. नीना गुप्ता बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आणि टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी आजही या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान कायम राखलं आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक होतं. आता येणाऱ्या काळात त्या कोणत्या भूमिकेत दिसतात हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात