भाचीसोबत सलमान खान तर लेकीसोबत ऐश्वर्या; अनंत-राधिकाच्या साखरपुड्यासाठी एकत्र आले बॉलिवूडचे कलाकार
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांची एंगेजमेंट झाली, ज्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या दोघांच्या एंगेजमेंटमध्ये बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स सहभागी झाले होते. या सेलेब्सनी इथे चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनंत आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटमध्ये कोण कोणत्या बॉलिवूड स्टार्सनीलक्ष वेधून घेतलं पाहा
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांची एंगेजमेंट झाली, ज्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या दोघांच्या एंगेजमेंटमध्ये बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स सहभागी झाले होते.
2/ 8
या पार्टीत बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही हजेरी लावली होती. यावेळी दोघेही खूप छान दिसत होते.या पार्टीत पठाण अभिनेत्री दीपिका पदुकोण साडीत दिसली. दीपिकाची ही स्टाईल सर्वांनाच खूप आवडते.
3/ 8
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने अनंत आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटला हजेरी लावली होती. यादरम्यान तो पारंपारिक पोशाखात खूपच छान दिसत होता. सलमानसोबत त्याची भाची अलीजेह अग्निहोत्रीही उपस्थित होती.
4/ 8
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनेही अनंत आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटला हजेरी लावली होती. यावेळी बहीण खुशी, अर्जुन कपूर आणि वडील बोनी कपूर देखील उपस्थित होते.
5/ 8
गौरी खान आणि तिचा मुलगा आर्यन खान देखील अंबानी कुटुंबाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. आई-मुलाच्या या जोडीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
6/ 8
या पार्टीत सर्वांच्या नजरा सारा अली खानवर खिळल्या होत्या. तिचा लूक सर्वांनाच आवडला आहे. या पार्टीत ती मनीष मल्होत्रासोबत दिसली.
7/ 8
या पार्टीत कतरीना कैफ देखील पोहोचली होती. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कतरीना खूपच सुंदर दिसत होती.
8/ 8
बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या रॉय बच्चन या पार्टीत लेक आराध्या सोबत पोहचली होती. दोघीही मायलेकींचा हा ट्रॅडिशनल लूक पाहून सगळेच चकित झाले.