बॉयफ्रेंड पैसे तर मागायचा, पण माझ्या कामाची त्याला लाज वाटायची; नीना गुप्तांचा गौप्यस्फोट

बॉयफ्रेंड पैसे तर मागायचा, पण माझ्या कामाची त्याला लाज वाटायची; नीना गुप्तांचा गौप्यस्फोट

नीना गुप्ता सुरुवातीच्या काळात वेस्टइंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत राहिल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या बिनधास्त आणि स्पष्ट स्वभावासाठी ओळखल्या जातात. वयाच्या 60 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक करणाऱ्या नीना गुप्तांकडे सध्या बरेच सिनेमा आहेत. लवकरच त्या कंगना रणौतच्या पंगा सिनेमात दिसणार आहेत. सध्या त्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. या निमित्तानं नुकत्याच दिलेल्या एका मुलखातीत त्यांच्या कमबॅक तसेच खासगी आयुष्याबद्दल त्यांनी बरेच खुलासे केले आहेत.

माय गुड टाइम्सला दिलेल्या मुलाखातीत नीना गुप्ता यांना त्यांच्या ट्वीट करुन काम मागण्याविषयी प्रशअन विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, मला कोणाकडेही पैसे मागण्याची लाज वाटते. पण काम मागायची अजिबात लाज वाटत नाही. जेव्हा मी सुरुवातीला मुंबईला आले होते तेव्हा माझा बॉयफ्रेड माझ्यासोबत होता. मी पृथ्वी थिएटरच्या किचनमध्ये काम करत असे आणि त्यावेळी मला रात्रीचं जेवण फ्री मिळत असे.

आलिया भटच्या आईचं वादग्रस्त विधान, अफजल गुरुला म्हटलं ‘बळीचा बकरा’

View this post on Instagram

At the #Panga promotions, releasing on 24th January. 💎 @birdhichand

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

नीना पुढे म्हणाल्या, माझा बॉयफ्रेंड माझ्याकडे पैसे मागून त्यातून सिगारेट ओढत असे. पण त्याला लाज वाटायची की मी असं काम करते. तो मला म्हणायचा की तू भरीत बनवण्यासाठी आली आहेस इथे की, अभिनेत्री होण्यासाठी. म्हणजे त्याला माझ्याकडे पैसे मागण्याची लाज वाटत नसे मात्र माझ्या कामाची लाज वाटायची. पण कोणाकडे काही काम मागण्यात लाजण्यासारखं काही आहे असं मला नाही वाटतं.

'फुरसत से आया है झुंड रे...', बिग बींचा बहुचर्चित Jhund Teaser रिलीज

नीना गुप्ता सुरुवातीच्या काळात वेस्टइंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत राहिल्या होत्या. या मुलाखतीत नीना म्हणाल्या, मला अगदी सुरुवातीला काम मागायची लाज वाटत असे. पण आता असं कधीच वाटत नाही. 2017मध्ये नीना गुप्ता यांनी ट्वीटवरुन आपण चांगली अभिनेत्री असूनही काम मिळत नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना एक दोन नाही तर तब्बल 4 सिनेमांच्या ऑफर मिळाल्या. त्यापैकी 2018 मध्ये आलेला त्यांचा ‘बधाई हो’ सुपरहिट ठरला होता. लकवकरच त्यांचा पंगा आणि 'शुभमंगल ज्यादा सावधान' हे दोन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

VIDEO : साराच्या ‘आदाब’ला सलमान खाननं दिलेली प्रतिक्रिया पाहून व्हाल हैराण!

First published: January 21, 2020, 5:03 PM IST

ताज्या बातम्या