VIDEO : साराच्या ‘आदाब’ला सलमान खाननं दिलेली प्रतिक्रिया पाहून व्हाल हैराण!

VIDEO : साराच्या ‘आदाब’ला सलमान खाननं दिलेली प्रतिक्रिया पाहून व्हाल हैराण!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सारा अली खान सलमानला आदाब करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : अभिनेत्री सारा अली खान सध्या तिचा आगामी सिनेमा ‘लव्ह आज कल’मुळे चर्चेत आहे. नुकतीच तिनं कार्तिक आर्यनसोबत बिग बॉस रिअलिटी शोमध्येही हजेरी लावली. यावेळी तिनं तिच्या सिनेमाच्या प्रमोशनसोबतच घरातील स्पर्धकांसोबत खूप मस्ती सुद्धा केली. दरम्यान बिग बॉसच्या सेटवरील साराचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण यातील सारा आणि सलमानचा एक व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सारा अली खान सलमानला आदाब करताना दिसत आहे. ज्यावर सलमान तिला प्रेमानं मिठी मारतो. सलमानच्या या प्रतिक्रियेमुळे सर्वच हैराण झाले आहेत. कारण सलमान बऱ्याच वेळा अभिनेत्रींशी असं वागत नाही. मात्र साराच्या वडीलांशी त्याचं नातं पाहता सलमाननं साराला आपल्या मुलीप्रमाणं मिठी मारली. सारानं सलमान आणि कार्तिकसोबतचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ तिच्याच नाही तर भाईजानच्याही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 2009 मध्ये दीपिका आणि सैफच्या लव्ह आज कलचा सिक्वेल आहे. दरम्यान लेकीच्या या सिनेमाच्या ट्रेलरवर सैफनं तितकीशी चांगली प्रतिक्रिया दिली नव्हती. मुलीच्या सिनेमापेक्षा आपलाच सिनेमा जास्त चांगला असल्याचं सैफनं म्हटलं होतं. हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हेलेंटाइन डे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2020 11:30 AM IST

ताज्या बातम्या