मुंबई, 5 मे : सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ सध्या छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो बनला आहे. दर आठवड्याला काहीतरी वेगळं देणारा आणि सर्वांना पोट धरून हसायला लावणारा हा शो सध्या टीआरपीच्या यादीत पहिल्या पाचमध्ये सहभागी झाला आहे. या आठड्यात या शोमध्ये ‘बधाई हो’ सिनेमाच्या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी कपिल शर्मानं नीना गुप्ता, गजराज राव आणि दिग्दर्शक अमित शर्मा यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या आणि मस्तीही केली. नीना गुप्ता आणि गजराज राव यांनी या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या शोदरम्यान त्यांनी हा पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव प्रेक्षकांशी शेअर केला आणि एकमेकांची पोलखोलही केली. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गजराज राव यांनी त्यांच्या पत्नीसोबत असलेल्या खास नात्याविषयी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘मी माझ्या पत्नीला दर अर्ध्या तासानं फोन करतो. कारण, मी एक हॉलिवूड सिनेमा पाहिला, ज्यात एख लग्न झालेलं जोडपं असतं. एक दिवस त्या दोघांचीही स्मृती जाते आणि त्यांना त्यावेळी लक्षात येत की त्या दोघांनीही एकमेकांना लक्षात ठेवण्यासाठी अशी कोणतीही गोष्ट शेअर केलेली नाही. हा सिनेमा पाहिल्यावर मी ठरवलं की, मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या पत्नीशी शेअर करेन.’
Gajraj Rao ko mila Sapna se ek anmol tohfa! Kya hai woh? Dekhiye Badhai Ho ki team ke saath #TheKapilSharmaShow, aaj raat 9:30 baje. @iAmitRSharma @raogajraj @iAmitRSharma @KapilSharmaK9 @kikusharda @haanjichandan @Krushna_KAS @bharti_lalli @sumona24 @RochelleMRao @apshaha pic.twitter.com/WArBcBbikx
— sonytv (@SonyTV) May 4, 2019
अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही या सिनेमाच्या काही आठवणी यावेळी शेअर केल्या. त्या म्हणाल्या या भूमिकेसाठी माझ्या अगोदर तब्बूला विचारण्यात आलं होतं मात्र तिनं नकार दिला पण त्यासोबतच तिनं दिग्दर्शकांना माझं नावही सुचवलं. आयुष्मान खुरानानं अगोदरच हा सिनेमा साइन केला होता. त्याला वाटलं की आईच्या भूमिकेसाठी मी हॉट वाटेन त्यामुळे त्यानं सुरुवातीला विरोध केला. मात्र नंतर माझी शॉर्टफिल्म ‘खुजली’ पाहिल्यावर निर्मात्यांनी मला या सिनेमासाठी कास्ट केलं.
आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बधाई हो सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या सिनेमानं 200 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. यासिनेमाचं प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही कौतुक केलं होतं. ‘क्वीन’ कंगनाला आदर्श मानणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा करण जोहरनं केला ब्रेन वॉश? हनीमूनला पॅरिसला जातो सांगून शाहरुख या ठिकाणी घेऊन गेला गौरीला, स्वतः केला खुलासा SOTY2 चं ‘फकीरा’ गाणं रिलीज, दिसली टायगर- अनन्याची अफलातून केमिस्ट्री