मुंबई, 4 मे- बॉलिवूडचा किंग शाहरुख आणि त्याच्या पत्नीची गौरी खानची लव्हस्टोरी तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या प्रेमाची प्रत्येक गोष्ट शाहरुखच्या कट्टर चाहत्यांना माहीत असली तर आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी कदाचित तुम्हाला याआधी कधीच माहीत नसेल. शाहरुख सिनेसृष्टीत आला नव्हता तेव्हापासूनची त्यांची लव्हस्टोरी आहे.
शाहरुखच्या कठीण प्रसंगात गौरीच होती जी त्याच्यासोबत ठामपणे उभी होती. नुकत्याच एका मुलाखतीत शाहरुखने आपल्या हनीमूनशी निगडीत एक किस्सा शेअर केला. शो होस्ट करणाऱ्या विकी कौशलने शाहरुख आणि गौरीचा एक फोटो दाखवला. दोघांच्या हनीमूनवेळचा तो फोटो होता.
दोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या 'त्या' सीनची चर्चा
‘मला माहीत होतं की ती मुलगी योग्य नाही,’ जेव्हा रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलल्या नीतू कपूर
तो फोटो पाहून शाहरुख म्हणाला की, लग्नानंतर हनीमूनला पॅरिसला नेण्याचं वचन मी गौरीला दिलं होतं असं तो म्हणाला. पण माझ्याकडे तेव्हा विमानाचं तिकीट काढण्याचेही पैसे नव्हते. त्यामुळे तेव्हा काही आम्ही गेलो नाही.
त्यानंतर बऱ्याच दिवसांनी माझ्या राजू बन गया जेंटलमन सिनेमाचं चित्रीकरण दार्जिलिंगमध्ये होणार होतं. हे जेव्हा मला कळलं तेव्हा गौरीला तिथे घेऊन जाण्याची ही एक चांगली संधी असल्याचं मला जाणवलं. इथे मी गौरीला पॅरिस सांगून दार्जिलिंगला घेऊन गेलो होतो.
या आजींबरोबरच्या फोटोमुळे मलायका झाली ट्रोल, युझर्स म्हणाले तुम्ही तर एकाच वयाच्या!
View this post on Instagram
After years the wife has allowed me to post a pic I have taken...she’s all heart!
गॅब्रिएलाच्या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो, अर्जुन रामपाल अशी घेतो काळजी
यावेळी गौरीनेही शाहरुखचं एक सिक्रेट सांगितलं. गौरी म्हणाली की, ‘जसं मी आधी सांगितलं की शाहरुखला तयार व्हायला दोन तास लागतात तसंच सेल्फी घेतानाही तो हे पाहत नाही त्याच्यासोबतचे कसे दिसत आहेत. त्याला फक्त तो कसा दिसतो ते पाहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळेच मी त्याच्यासोबत आता सेल्फी काढणं बंद केलं आहे.’ पण वर्षातून एकदा एकत्र सेल्फी काढण्याची परवानगी त्याला आहे.
VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स