मुंबई, 5 मे : सध्या बॉलवूडमध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमातून तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोन नवोदित अभिनेत्री बॉलिवूड डेब्यू करत आहे. पण सध्या तारा तिच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या तारा सुतारियानं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगना आपली रोल मॉडेल असल्याचं म्हटलं होतं. पण आता मात्र तारानं तिच्या या वक्तव्यावरून युटर्न घेत दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्राला आपल्या आदर्श असल्याचं म्हटलं आहे. करण जोहर आणि कंगना रनौत यांच्यातील बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून असलेला वाद सर्वांनाच माहीत आहे. अशातच तारानं काही दिवसांपूर्वी कंगनाची स्तुती करत कंगना आपली आदर्श असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र ताराच्या या वक्तव्यामुळे करण जोहर नाराज झाला असून त्यानं याविषयी ताराकडे आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यापुढे अशाप्रकारचं कोणतंही विधान न करण्याची तंबीही तिला दिली आहे. ज्यामुळे तारानं आता युटर्न घेतला आहे असं म्हटलं जातंय.
अनन्या पांडे, तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ नुकतेच ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’च्या प्रमोशनसाठी जयपूरला गेले होते. यावेळी ताराला तिची आदर्श अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र काही दिवसांपूर्वी कंगनाचं नाव घेणाऱ्या तारानं यावेळी प्रियांका चोप्रा आमि दीपिका पादुकोणचं नाव घेतलं. पण काही दिवसांपूर्वी कंगनाचं नाव घेतल्याची तिला आठवण करून दिली असता तिनं कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. या आजींबरोबरच्या फोटोमुळे मलायका झाली ट्रोल, युझर्स म्हणाले तुम्ही तर एकाच वयाच्या! काही दिवासंपूर्वीच्या एका मुलाखतीत तारा म्हणाली होती की, ‘मी कंगना रनौतचा खूप सन्मान करते. आउटसाइडर असल्यानं मी तिला माझा आदर्श मानते. कंगनानं तिच्या कौशल्याच्या जोरावर कोणाच्याही पाठींब्याशिवाय बॉलिवूडमध्ये यश मिळवलं आहे. तिच्याकडे जे काही आहे ते सर्व तिनं स्वतः मिळवलं आहे. त्यामुळे ती माझी आदर्श आहे.’ ताराच्या या वक्तव्यानंतर कंगनाची बहिण रंगोलीनंही ताराचं कौतुक केलं होतं. पण आता तारानं दीपिका आणि प्रियांकाचं नावं घेतल्यानं कंगना काय प्रतिक्रिया देते याची सर्वांना उत्सुकता आहे.
दोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या ‘त्या’ सीनची चर्चा सलमानच्या ‘या’ चाहतीनं रिलीजच्या आधीच पाहिला ‘भारत’, दिग्दर्शकांनी केला खुलासा