जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Nawazuddin Siddiqui: 'हड्डी'तील भूमिका साकारुन जाणवलं अभिनेत्रींचं दुःख; नेमकं काय म्हणाला नवाजुद्दीन सिद्दिकी?

Nawazuddin Siddiqui: 'हड्डी'तील भूमिका साकारुन जाणवलं अभिनेत्रींचं दुःख; नेमकं काय म्हणाला नवाजुद्दीन सिद्दिकी?

Nawazuddin Siddiqui: 'हड्डी'तील भूमिका साकारुन जाणवलं अभिनेत्रींचं दुःख; नेमकं काय म्हणाला नवाजुद्दीन सिद्दिकी?

बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तो सतत हटके भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतो.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑगस्ट-   बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तो सतत हटके भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतो. लवकरच नवाज ‘हड्डी’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. यामध्ये नवाजुद्दीनला पाहून सर्वजण थक्क झाले होते. त्याला पहिल्या नजरेत कोणीही ओळखू शकलं नव्हतं. या पोस्टरमध्ये तो स्त्री वेशात दिसून आला होता. आगामी चित्रपटात नवाजुद्दीन ट्रान्सजेंडर आणि स्त्रीची दुहेरी भूमिका साकारताना दिसून येणार आहे. या भूमिकेबाबत नुकतंच त्याने आपलं मत व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या आगामी ‘हड्डी’ या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर समोर आलं होतं. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन आहे हे समजल्यानंतर सर्वजण चकित झाले होते. अभिनयाचं हे पोस्टर प्रचंड चर्चेत आहे. त्यानंतर आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने स्वतः आपल्या भूमिकेबाबत आणि त्यासाठी घ्याव्या लागलेल्या प्रचंड मेहनतीबाबत खुलासा केला आहे. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन ट्रान्सजेंडरच्या रूपात आहे. चित्रपटात काम केल्यानंतर अभिनेत्रींना सेटवर किती मेहनत घ्यावी लागते याची प्रचिती आपल्याला आल्याचं नवाजुद्दीननं म्हटलंय. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्या भूमिकेबाबत बोलताना सांगितलं, ‘मला हा शॉट देण्यासाठी तयार व्हायला तब्बल 3 तास लागले. मला या लुकमध्ये पाहून माझी मुलगी माझ्यावर नाराज झाली होती. परंतु तिला नंतर समजलं हे या भूमिकेसाठी आहे. त्यामुळे आता तिला काहीच अडचण नाहीय. तसेच त्यांनी म्हटलं, ‘हे सर्व अनुभवून मी एक गोष्ट सांगू शकतो. माझ्या नजरेत अभिनेत्रींचा सन्मान आणखीनच वाढला आहे. कारण अभिनेत्री हे सगळं दररोज करत असतात. एखाद्या अभिनेत्रीला मेकअप, हेयर, नेल्स किती काय-काय करावं लागतं. हे अजिबात सोपं नाहीय. आता मला लक्षात आलं की अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना व्हॅनिटीमधून बाहेर यायला इतका वेळ का लागतो. आता मी जास्त संयम बाळगणार’. **(हे वाचा:** Ishaan Khattar: शाहिद कपूरच्या भावानं खरेदी केलं आपलं पहिलं घर; अलिशान घराचा VIDEO आला समोर ) ‘हड्डी’ या चित्रपटाचं पोस्टर समोर आल्यापासूनच या चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. नवाजुद्दीनला या रुपात पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच आतुर आहेत. दिग्दर्शक अक्षत अजय शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. हा एक रिव्हेंज ड्रामा थ्रिलर चित्रपट असणार आहे. नवाजुद्दीन आणि अक्षतची भेट ‘द सेक्रेड गेम’च्या सेटवर झाली होती. या वेबसीरिजसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात