मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Nawazuddin Siddiqui: 'सात दिवस घरात डांबून अत्याचार...' नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

Nawazuddin Siddiqui: 'सात दिवस घरात डांबून अत्याचार...' नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीनच्या आईने तिची सून आलियाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आलियानेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 फेब्रुवारी : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या दाक्षिणात्य पदार्पण आणि वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. एकीकडे तो व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या पायऱ्या चढत आहे तर दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. त्याची पत्नी आलिया सिद्दीकीच्या वकिलाने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. याआधी नवाजुद्दीनच्या आईने तिची सून आलियाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आलियानेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली.

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान म्हणाले, 'नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांनी गेल्या सात दिवसांपासून आलियाला जेवण दिलेले नाही. झोपण्यासाठी पलंग आणि आंघोळीसाठी बाथरूमही दिलेले नाही. खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून चोवीस तास अंगरक्षक तैनात आहेत. आलिया सिद्दीकीच्या वकिलाने असेही सांगितले की, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबीयांनी आलियाला घरातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्यावर अत्याचार केला. पोलिसांना अटक करण्याची धमकी दिली. आलियाला तिच्या दोन अल्पवयीन मुलांसह हॉलमध्ये राहण्यास भाग पाडले जाते.

हेही वाचा - प्लास्टिक, काच सगळं झालं आता मानवी कातडीपासून ड्रेस बनवणार उर्फी; म्हणाली, 'कोणाला तरी मारून...'

आलियाने दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांची मुले दोन सोफ्यांना जोडून झोपलेली दिसत आहेत. तिघेही हॉलमध्ये आहेत, तिथे एक महिलाही बसलेली दिसली. हा व्हिडिओ शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गेल्या 7 दिवसांपासून मला माझ्याच नवऱ्याच्या घरात राहायला, झोपायला मला परवानगी नाही. नुकतीच दुबईहून परतलेली माझी मुलं हॉलमध्ये माझ्यासोबत झोपत आहेत.'

आलियाने पुढे लिहिले की, 'मी पाहुण्यांसाठी बनवलेल्या छोट्या बाथरूममध्ये आंघोळ करत आहे. जेवण नाही, झोप नाही आणि वर माझ्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक आहेत. आता कॅमेरेही बसवण्यात आले असून प्रत्येक कामावर लक्ष ठेवले जात आहे. शांतता नाही आणि गोपनीयता नाही. सातही बेडरूम माझ्या सासरच्या लोकांनी बंद केल्या आहेत. माझा पती नवाजुद्दीन सिद्दीकी देखील मला संरक्षण देण्यासाठी किंवा माझ्यासाठी उभा राहिला नाही. नवाजुद्दीनच्या पत्नीने पुढे सांगितले की, 'न्यायालयाच्या कागदपत्रांवर त्याच्या वकिलालाही त्याची स्वाक्षरी घेण्याची परवानगी दिली जात नाही. सासरच्यांकडून होणारा छळ कधी संपेल का? आलियाने शेवटी लिहिले की ती न्यायाची वाट पाहत आहे.'

नवाजुद्दीनने आलिया उर्फ ​​अंजना किशोर पांडेशी लग्न केले आहे. त्यांना शोरा आणि यानी ही दोन मुले आहेत. 19 मे 2020 रोजी आलियाने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की ती नवाजुद्दीनपासून घटस्फोट घेत आहे. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे प्रथमच सर्वांना समजले. मात्र, त्यानंतर दोघांनी एकमेकांवर अनेकदा गंभीर आरोप केले आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment