मुंबई, 01 फेब्रुवारी : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायम चर्चेत असते. बोल्ड अंदाज, हटके फॅशन, अतरंगी कपडे यामुळे उर्फी कायमच चर्चेचा विषय ठरते. रोज नवनवीन हटके लुकमध्ये उर्फी मीडियासमोर येत असते. उर्फी जावेद अनेकदा सोशल मीडियावर बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसते, ज्यामुळे तिला तीव्र टीकेलाही सामोरं जावं लागतं. नुकतंच चित्रा वाघांसोबत उर्फीचा वाद चांगलाच तापला होता. आता ते प्रकरण काहीसं शांत झालं असलं तरी उर्फीची अतरंगी फॅशन मात्र अजूनही करणं चालूच आहे. अशातच तिने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
उर्फीला आणि तिच्या अतरंगी लुकला दुर्लक्षित करण अवघड आहे. नाही म्हटलं तरी सगळ्यांचं तिच्याकडे लक्ष जातंच. नुकताच उर्फीने नवा लुक केला असून नेहमीप्रमाणे तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण त्याही पेक्षा तिनं केलेल्या वक्तव्याची जास्त चर्चा होत आहे.
हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: आशुतोषने पुन्हा दिली अरुंधतीची साथ; बदल्यात मागितलं 'ते' वचन
उर्फी जावेद अलीकडेच एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. नेहमीप्रमाणेच अभिनेत्रीने तिच्या ड्रेसने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिने टॉप म्हणून जीन्स घातली होती. तिची ही फॅशन पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. यादरम्यान उर्फी जावेदने सांगितलं कि तिचा ड्रेस जागेवरच खराब झाला, म्हणून तिने घाईघाईत जीन्सचा टॉप बनवला.
View this post on Instagram
रेस्टॉरंटच्या बाहेर पापाराझींनी उर्फी जावेदला घेरले आणि तप्रश्न विचारायला सुरुवात केली. यावेळी उर्फीला एकानं विचारलं कि, अशी कुठली गोष्ट बाकी आहे का ज्यापासून तुझा ड्रेस बनवायचा राहिला आहे. या प्रश्नाचं उर्फीने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ती म्हणाली, 'आता फक्त माणसाची कातडीच राहिली आहे. म्हणून जर मी एखाद्या व्यक्तीला मारून त्याच्या त्वचेतून ड्रेस बनवला तर किती चांगले होईल.' उर्फीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून तिच्या या विधानावर आता टीका होत आहे.
उर्फी जावेदच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने आतापर्यंत 'बेपनह', 'मेरी दुर्गा', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Urfi Javed