मुंबई, 02 मे : साधा चेहरा आणि उंची असलेल्या नवाजुद्दीन सिद्दिकीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारून नवाजने आपली अभिनय क्षमता दाखवून दिली आहे. पण त्याचसोबत मध्यंतरी तो आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. त्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. या दोघांचा संसार चव्हाट्यावर आला. अभिनेत्याने या आरोपांवर मौन बाळगणंच पसंत केलं. आता बऱ्याच दिवसानंतर तो लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. आता त्याने वैयक्तिक आयुष्याविषयी पुन्हा मोठा खुलासा केला आहे. नवाज ‘जोगिरा सारा रारा’ या चित्रपटात पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता त्याच्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. हा चित्रपट 12 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री नेहा शर्मासोबत नवाज पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. ट्रेलर लॉन्चवेळी मीडियाशी बोलताना प्रोफेशनलसोबतच नवाजने वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलासा केला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीला खूप मेहनतीनंतर चित्रपटात काम मिळाले आहे. अभिनेत्याने सांगितले की, ‘मी सुरुवातीला आलो तेव्हा मला ऑडिशन कसे द्यावे हे माहित नव्हते? मी माझा बायोडेटा घेऊन फिरायचो. एकदा कास्टिंग डायरेक्टरला ऑफिसमध्ये भेटून बायोडाटा दिला. मग त्याने फोटो मागितल्यावर मागच्या खिशातून तो काढला, तर फोटो मध्येच फाटला होता. हे बघून तो चिडला आणि रागात म्हणाला, निघून जा, असा फोटो द्यायचा नाही, कुठून येतात अभिनेता व्हायला.’ असं म्हणत त्याने अपमान केला. Parineeti Chopra: परिणितीच्या होणाऱ्या नवऱ्याचं ईडीच्या आरोपपत्रात नाव; पुढे ढकलणार का अभिनेत्रीचा साखरपुडा? ‘जोगिरा सारा’ चित्रपटात नवाजुद्दीन एका अशा व्यक्तीच्या भूमिकेत आहे, ज्याला लग्नाचं टेन्शन येत असतं. या चित्रपटात नवाजुद्दीन नेहा शर्मासोबत रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. प्रेस कॉन्फरन्सदरम्यान नवाजुद्दीन म्हणाला, ‘कदाचित माझ्या रंगामुळे मला आजपर्यंत व्हिलनचे रोल मिळत आहेत. या चित्रपटाला हो म्हणण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे यात मला रोमान्स करण्याची संधी मिळाली. मला एक अभिनेता म्हणून स्वतःचा शोध घ्यायचा आहे. कारण एका प्रकारच्या पात्राचा मला कंटाळा येतो. जर कोणी येऊन मला सांगितले की मी तुला सुपरस्टार बनवणार आहे, तीच व्यक्तिरेखा साकारण्याची अट असेल, तर मी ऑफर स्वीकारण्यापेक्षा स्वत: शूट करणे पसंत करेन.’ जेव्हा नवाजला विचारण्यात आले की तो रोमँटिक चित्रपटांमध्ये किती कम्फर्टेबल आहे, तेव्हा तो म्हणाला, “माझे नशीब असे आहे की चित्रपटांमध्ये विसरा पण मला खऱ्या आयुष्यातही रोमान्स करण्याची संधी मिळाली नाही. माझ्या आयुष्यात रील आणि रिअल लाईफमध्ये काय चाललंय याची मला जाणीव नाही.’ असं तो म्हणाला आहे.