मुंबई, 19 जून : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर कंगना राणौतच्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या या चित्रपटात दोघेही कपल म्हणून काम करताना दिसणार आहेत. ‘टिकू वेड्स शेरू’ मध्ये 49 वर्षांचा नवाजुद्दीन सिद्दीकी केवळ 21 वर्षांच्या अवनीतसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याच कारणांवरुन चित्रपटावर काही जण टीका करत आहेत. या चित्रपटात दोघांमध्ये शूट केलेल्या एका रोमँटिक किसिंग सीनवरून बराच वाद झाला होता. आता सोशल मीडियावर होत असलेल्या या टीकेदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीने अवनीतसोबत केलेल्या किसिंग सीनवर मौन सोडलं आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी अवनीत कौरसोबत दिसणार आहे. या दोन्ही कलाकारांच्या वयात जवळपास 25 वर्षांचा फरक आहे. ट्रेलरमध्ये दोघांमधील किसिंग सीन पाहून प्रेक्षक निराश झाले होते, ज्यावर बरीच टीकाही झाली होती. शूटिंग सुरू होण्याआधी गेल्या वर्षी या जोडीची अधिकृत घोषणा झाली तेव्हाही त्यावरून वाद निर्माण झाला होता. आता एका मुलाखतीत, नवाजुद्दीन सिद्दीकीने या किसिंग सीनवर भाष्य केलं आहे.
याविषयी बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, ‘यावरून इतका वाद का? लोकांना नेमका काय प्रॉब्लेम आहे?’ पुढे तो म्हणाला, ‘रोमान्सला वयाचं बंधन नसतं. तरुणांमध्ये रोमान्स शिल्लक राहिलेला नाही, ही समस्या आहे. मला वाटत की तरुणांना आता रोमान्स करण्यात काही विशेष वाटत नाही. आम्ही त्या काळातील आहोत जेव्हा रोमान्सची गोष्ट काही वेगळीच होती. त्याची आता तुलना होऊ शकत नाही. आपण नेहमीच प्रेम करत राहू. आजही शाहरुख खान चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका करत आहे कारण तरुण पिढी ते करू शकत नाही. त्यांना रोमान्स माहीत नाही.’ Adipurush: आदिपुरुषच्या लेखकांच्या जीवाला धोका? मनोज मुंतशीर यांची सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांत धाव नवाजुद्दीन सिद्दीकी पुढे म्हणाला, ‘आजकाल सर्व काही व्हॉट्सअॅपवर होते, मग ते प्रेम असो किंवा ब्रेकअप. यामागे एक कारण आहे. रोमान्स जगलेले लोक रोमान्स करू शकतात, दुसऱ्याला ते नाही जमणार. ‘टिकू वेड्स शेरू’मध्ये अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी चित्रपटात लग्न करतात आणि ट्विस्ट आणि टर्नसह दोघेही प्रेमात पडतात. अशा परिस्थितीत, चित्रपटात दोघांमध्ये रोमँटिक सीक्वेन्स आहेत, ज्याला नेटिझन्स त्यांना जोरदार ट्रोल करत आहेत. पण आता हा चित्रपट नेमकं कसा असेल हे पाहण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
‘टिकू वेड्स शेरू’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी एका ज्युनियर आर्टिस्टच्या भूमिकेत आहे. तर अवनीत कौर एका महत्त्वाकांक्षी तरुणीची भूमिका साकारणार आहे जिला अभिनेत्री बनायचे आहे. तिच्या या स्वप्नामुळे ती नवाजुद्दीनशी लग्न करते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. कंगना राणौतच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मणिकर्णिका फिल्म्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ 23 जून रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.

)







