मुंबई, 19 जून : आदिपुरुष हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटाला कौतुकापेक्षा ट्रोलिंग आणि विरोधाचा सामना करावा लागत आहे. चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, चित्रपटाचे संवाद लिहिणाऱ्या लेखकावरही लोक सोशल मीडियावर टीका करत आहेत. त्यांना मोठा विरोध होत आहे. आता परिस्थिती पाहता आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा वाद अधिकच वाढत चालला आहे. प्रेक्षकांसह अनेक राजकीय मंडळींनी देखील या चित्रपटाचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. लेखक मनोज मुंतशीर यांनी चित्रपटाला आणि त्यांना होणार वाढत विरोध पाहता जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. मनोज मुंतशीर यांच्या आवाहनाचा विचार करून मुंबई पोलिसांकडून त्यांना सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते आणि आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा चित्रपट 600 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. या चित्रपटातील संवाद,व्यक्तिरेखा, VFX आणि अभिनय सगळ्याच गोष्टीवर प्रेक्षक आक्षेप घेत आहेत. त्यामुळे चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी वाढतच चालली आहे. चित्रपटाला होणारा वाढता विरोध पाहता मनोज मुंतशीर यांनी हनुमंताच्या तोंडी असलेले आक्षेपार्ह डायलॉग बदलणार असल्याचा निर्णय घेतला होता. Adipurush Controversy: वाद वाढला, अयोध्येतील संतांचे निर्मात्यांवर गंभीर आरोप; चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मनोज मुंतशीर यांनी ट्विट करून लिहिले होते की, ‘रामकथेतून पहिला धडा शिकता येतो तो म्हणजे प्रत्येक भावनेचा आदर करणे. बरोबर की चूक, काळ बदलतो, भावना राहते. मी आदिपुरुष मध्ये 4000 हून अधिक ओळींचे संवाद लिहिले, 5 ओळींवर काही भावना दुखावल्या. त्या शेकडो ओळींमध्ये जिथे श्रीरामाची स्तुती होती, माता सीतेच्या पावित्र्याचे वर्णन होते, तिची स्तुतीही व्हायची होती, जी मला का मिळाली नाही हेच कळत नाही. माझ्याच भावांनी सोशल मीडियावर माझ्यासाठी असभ्य शब्द लिहिले. ज्यांच्या आदरणीय मातांसाठी मी टीव्हीवर अनेकदा कविता वाचल्या, त्यांनी माझ्याच आईला अश्लील शब्दात संबोधले. मी विचार करत राहिलो, मतभेद असू शकतात, पण माझ्या भावांच्या मनात अचानक एवढी कडवटपणा कुठून आला की प्रत्येक स्त्रीला आई मानणाऱ्या श्री रामांना ते विसरले. 3 तासांच्या चित्रपटात मी 3 मिनिटांसाठी तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळं काहीतरी लिहिलं असण्याची शक्यता आहे, पण मला सनातन-द्रोही म्हणण्याची तुम्हाला इतकी घाई का झाली हे मला कळलं नाही.’
Mumbai Police provides security to dialogue writer of #Adipurush, Manoj Muntashir after he sought a security cover citing a threat to his life. Police say that they are investigating the matter.
— ANI (@ANI) June 19, 2023
(File photo) pic.twitter.com/1WiWiOhclo
लेखकाने पुढे लिहिले, ‘ही पोस्ट का? कारण तुझ्या भावनांपेक्षा माझ्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही. मी असे संवाद का लिहिले त्यावर अगणित स्पष्टीकरण देऊ शकतो, पण यामुळे तुमचे दुःख कमी होणार नाही. मी आणि चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकाने ठरवले आहे की, जे काही संवाद तुम्हाला दुखावत आहेत, आम्ही त्यांची उजळणी करू आणि या आठवड्यात ते बदलून चित्रपटात समाविष्ट करू. श्री राम तुम्हा सर्वांचे कल्याण करो!’

)







