Home /News /entertainment /

Navratri 2021 : एकवीरा देवीच्या रुपातून या मराठमोळ्या अभिनेत्रीने वेधलं चाहत्यांचं लक्ष, पाहा Photos

Navratri 2021 : एकवीरा देवीच्या रुपातून या मराठमोळ्या अभिनेत्रीने वेधलं चाहत्यांचं लक्ष, पाहा Photos

मराठमोळी ही अभिनेत्री नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणाताना देखील दिसत आहे.

    मुंबई, 12ऑक्टोबर: शारदीय नवरात्रौत्सवाचे (Navratri 2021)औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar)गेल्या काही दिवसांपासून रोज देवीच्या विविध रुपातील फोटो शेअर करत आहे. दरम्यान आज नवरात्रीचा साहावा दिवस असून आज (navratri colours 2021) लाला रंगाचा मान आहे. अपूर्वाने आज एकवीरा देवीचे रुप धारण केले आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणाताना दिसत आहे. आज देखील तिने एकवीरा देवीचे रुप धारण करत काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की,लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते, अशा अशायची पोस्ट करत तिने याबद्दल तिच्या टीमचे देखील कौतुक केले आहे व सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
    शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप धारण केले होते. पहिला दिवशी फोटोशेअर करत तिने म्हटले की, कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते. वाचा :VIDEO: अरुंधतीने संजनाला पुन्हा ठणकावलं! 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप धारण केले होते. तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धरण करत देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले होते की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले होते.चौथ्या दिवशी अपूर्वाने जगदंबा मातेच्या रुपात पाहायला मिळली. वाचा : 'मार्ग चुकला पण हेतू नाही'; बिग बॉसमध्ये जाण्यावरून शिवलीला पाटील यांनी मागितली माफी अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धरण करत देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले होते की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले आहे. तिने पुढे म्हटले आहे की, जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे. अंबा परमेश्वरी,चामुनडेश्वरी,ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंध पुराणात याचा उल्लेख आहे. अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जगदंबा मातेचे रूप धारण केले होते.जगदंबा माता (राशीनची देवी) मंदिर,अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहे. देवी यमाई या नावानेही प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिराच बांधकाम शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. हलती दीपमाला हे या मंदिराच खास वैशिष्टय़ असल्याची माहिती देखील तिने दिली होती.
    नवरात्रीचा पाचव्या दिवशी अपूर्वाने बंगाली देवीचे रुप धारण केले होते. 'बंगाली देवी त्रिनयन दुर्गामाता, त्रिपूरा अगरतला'' अशी कॅप्शन देत तिने देवीच्या रुपातील काही फोटो शेअर केले होते. अपूर्वाची ही कल्पना सर्वांना आवडलेली आहे. चाहते देखील तिच्या या कल्पनेचे कौतुक करत आहे. व ती उद्या कोणत्या देवीच्या रूपात दिसणार याची वाट पाहत असतात.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Navratri

    पुढील बातम्या