मुंबई, 12ऑक्टोबर- 'बिग बॉस'(Bigg Boss Marathi) हा शो जितका लोकप्रिय आहे तितकाच तो विवादितसुद्धा मानला जातो. कधी आपल्या शो फॉरमॅटमुळे तर कधी स्पर्धकांमुळे या शोची चर्चा होत असते. 'बिग बॉस मराठी'मध्ये प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील(Shivlila Patil) यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे त्या प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. मात्र आजारी असल्याचं कारण देत त्यांनी या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तर नुकताच त्यांनी सर्व प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार, शिवलीला पाटीलने त्यांच्याशी संवाद साधत सर्वांची माफी मागितली आहे. रिपोर्टनुसार शिवलीलाने म्हटलं आहे, 'मी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने माझा सर्व वारकरी संप्रदाय आणि माझे सर्व ज्येष्ठ लोक माझ्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळे मी या सर्वांची दोन्ही हात जोडून आणि मस्तक टेकून माफी मागते. मी माझे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग चुकीचा निवडला असला तरी माझा उद्देश अतिशय प्रामाणिक आणि चांगला होता. असं म्हणत शिवलीला पाटीलने सर्वांची माफी मागितली आहे. शिवलीला ही महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय महिला कीर्तनकार आहे. ती सोलापूर बारशी येथील आहे. तिने फारच कमी वयात कीर्तनाला सुरुवात केली होती.
(हे वाचा:'पदर, पदर... ' शिवलीला पाटीलचा जुना VIDEO व्हायरल; Bigg Boss'अंदाजाने ... )
आपल्या महाराष्ट्राला संतांचा मोठा वारसा लाभला आहे.महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे. आपल्या राज्यात भजन, कीर्तन अशा पारंपरिक कलेचं वास्तव्य आहे. अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनाने भक्तांना अध्यात्माकडे घेऊन जाण्याचं काम करतात. त्यांना विठुरायाच्या भक्तीत रमवतात. अशाच एक कीर्तनकार म्हणजे शिवलीला पाटील होय. त्यांच्या सांगण्यानुसार त्या नवसाने झालेल्या कन्या आहेत. तसेच त्यांना वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तनाची गोडी लागली होती. इतक्या लहान वयात त्यांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हेही एक कीर्तनकार होते. त्यामुळे हा वारसा त्यांना जन्मजात मिळाला आहे. त्यांनी अनेक कीर्तने करून आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
(हे वाचा:Bigg Boss Marathi: शिवलीला पाटील घराबाहेर! अचानक 'या' कारणास्तव ... )
शिवलीला पाटील या 'बिग बॉस मराठी'च्या सीजन ३ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये त्यांचं वागणं त्यांच्या कीर्तनापेक्षा पूर्णपणे वेगळं जाणवलं होतं. त्यामुळे चाहते त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. त्यांच्यावर मोठ्या प्रमणात सोशल मीडियावर टीका होऊ लागल्या होत्या. अनेक लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना ताई हा निर्णय चुकल्याचं म्हटलं होतं. तसेच अनेकांनी त्यांना बिग बॉसमधेय जायला नको होतं असंही म्हटलं आहे. त्यांनतर शोमध्ये त्यांची तब्ब्येत बिघडल्याचे दिसून आलं. त्यांनतर त्यांनी या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.