मुंबई, 12ऑक्टोबर- ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karate) हि मालिका अल्पावधीतचं प्रचंड लोकप्रिय झाली आहे. दरवेळीप्रमाणे रोमॅंटिक कथेला फाटा देत वेगळा विषय आपल्या समोर आणणाऱ्या या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेमध्ये सध्या अरुंधती (Arundhati) आणि संजनामध्ये (Sanjna) पुन्हा एकदा वाद होताना दिसून येत आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यात अरुंधती आणि संजनामध्ये पुन्हा वाद होताना दिसून येत आहे. नव्या प्रोमोमध्ये संजना अनिरुद्धच्या आईशी उद्धट वर्तवणूक करत असल्याचं दिसून येत आहे. आपण काहीही नवीन केलं किंवा स्वतः साठी काही केलं तर ते तुम्हाला पचत नाही. किंवा बघवत नाही असा आरोप ती आईंवर लावत आहे. यावर अरुंधतीचा पारा चढतो आणि ती संजनाला चांगलंच ठणकावते. संजनाला आईंशी नीट वाग म्हणजे बाकी सर्व तुझ्याशी नीट वागतील असा दम देताना दिसणं येत आहे. मात्र संजना नेहमीप्रमाणे अरुंधतीवर आरोप लावत आहे. ती अरुंधतीला म्हणते तुला या घरात राहायचं आहे म्हणून तू त्या मेडच्या चुका काढत आहेस तिला काढून टाकण्यास सांगत आहे. मात्र खरं पाहायला गेलं तर ती मेड अरुंधतीच्या सासूशी चुकीचं वागते त्यांना उद्धट बोलते. त्यामुळे अरुंधती तिच्यावर भडकते. **(हे वाचा:** ‘मार्ग चुकला पण हेतू नाही’;बिग बॉससाठी शिवलीला पाटीलने मागितली माफी ) मालिकेमध्ये अरुंधती आणि संजनाचं युद्ध काही संपताना दिसत नाही. संजना सतत विविध मार्ग शोधून अरुंधती आणि तिच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अरुंधतीही तिला सडेतोड उत्तर देताना दिसते. संजनाने अरुंधतीच्या आयुष्यात येत तिच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण केलं होतं. संजनाने अरुंधतीच्या आयुष्यात येत तिच्या पतीला तिच्यापासून हिरावून घेतलं आहे. तिचं वैवाहिक जीवन संपुष्ठात आणलं आहे. इतक्यावरच ती थांबली नाहीय, तर ती दिवसेंदिवस तिचं आयुष्य कसं दुःखद आणि वाईट होईल यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अरुंधती या परिस्थितीतही अगदी ठामपणे उभी आहे. ती या सर्वाचा अगदी हिमतीने सामना करत आहे. (**हे वाचा:** भार्गवी चिरमुलेने Navratri निमित्त नेसलेल्या ‘या’ साडीचं महत्त्व माहितेय का? ) स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने फारच कमी वेळेत रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्विस्टने चाहत्यांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेमध्ये एका आईचं आयुष्य रेखाटण्यात आलं आहे. एक आई आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करत असते. कधी ती आपल्या कामाचा आपल्या कष्टाचा गाजावाजा करत नाही. किंवा ती आपल्या कुटुंबासाठी कष्ट करून कधीच थकत नाही. मात्र तिच्या त्यागाचं कष्टाचं मूल्य आपल्याला नसतं. आपण तिला एक गृहिणी म्हणून नेहमीच कमी लेखतो. मात्र तिने निश्चय केला तर ती सर्वकाही शक्य करून दाखवू शकते. हेच या मालिकेतून दाखवण्यात आलं आहे.