मुंबई 5 ऑक्टोबर : प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी नवरात्री निमित्त पहिल्यांदाच
नवरात्री
निमित्त दुर्गा पूजेचे आयोजन मुंबईत केले आहे. सानू यांनी नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा पूजेतील विशेष पूजा म्हणजे कुमारिका पूजन सुद्धा केले. हा उत्सव पारंपरिक रित्या होत असून कुमार सानू रोज या पूजेला उपस्थित राहतात. नवरात्रीमधील षष्ठीपासून दुर्गोत्सवाला सुरुवात होते. या उत्सवाची सुरुवात बंगाल मधून झाली आहे. दुर्गोत्सवात बंगाली परंपरेनुसार विविध कार्यक्रम होतात. धुनूची नाच तसेच देवीची पूजा नित्य नियमाने होते. कुमार सानू यांच्या दूर्गोत्सवातील देवीची मूर्ती अतिशय आकर्षक दशभुज मूर्ती आहे. या देवीचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे आहे. तसेच देवीच्या तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. दुर्गोत्सवातील देखावा देवीची मूर्ती पारंपरिक पद्धतीच्या देखव्यात विराजमान करण्यात आली आहे. बंगाल धील पारंपारिक गाव या ठिकाणी साकरण्यात आले आहे. घरांचा देखावा घराच्या छतावर गवत तसेच भिंतींवर विविध नक्षीकाम करण्यात आले आहे. आसपासच्या परिसरात उजेडासाठी टोपली आणि त्यात लाईट, बांबूचे कठडे, छोटासा बाजार हे सर्व या ठिकाणी पाहयला मिळते. त्याचबरोबर कुमार सानू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी छोटासा स्टेज बनवण्यात आला आहे.
शिवाजी पार्कात अवतरली बंगाली संस्कृती, भव्य दुर्गापूजेचा पाहा Video
‘मी पहिल्यांदाच दुर्गापूजा आयोजित केली आहे. मला खूप छान वाटतंय. देवीच्या इच्छेनुसार ही दुर्गापूजा चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. तसेच लहान असतानाच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याची भावना कुमार सानू यांनी यावेळी व्यक्त केली.
गुगल मॅपवरून साभार
कुठे आहे हा उत्सव? कुमार सानू यांनी पहिल्यांदाच या उत्सवाचे आयोजन केले आहे.वर्सोवा येथील वर्सोवा वेलफेअर ग्राउंड येथे हा उत्सव पार पडत आहे. वर्सोवा मेट्रो स्थानकपासून 10 मिनिटे अंतरावर हे मैदान आहे. एक वेगळा आनंद आणि चैतन्य तेथील वातावरणात आहे. दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाचा समारोप होतोय.