मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Kapil Sharma: कपिलने शोमध्ये थेट पंतप्रधान मोदींना दिलं आमंत्रण; पण कॉमेडीयनला मिळालं असं उत्तर

Kapil Sharma: कपिलने शोमध्ये थेट पंतप्रधान मोदींना दिलं आमंत्रण; पण कॉमेडीयनला मिळालं असं उत्तर

द कपिल शर्मा शो

द कपिल शर्मा शो

कपिल शर्माने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना 'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या शोमध्ये आमंत्रित केले आहे. पण त्याने आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोमध्ये येण्यासाठी कधी आमंत्रित केले आहे का? कपिल शर्माने अलीकडेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आणि पंतप्रधानांची त्यावर आलेली प्रतिक्रियाही सांगितली.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 मार्च : सगळ्यांना खळखळून हसवणारा लोकप्रिय शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'. हा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' खूप लोकप्रिय आहे. हा शो तसेच कॉमेडियन स्वतः अनेकदा वादात सापडला असला तरी शोची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. कपिल शर्माने आतापर्यंत बॉलीवूडपासून दक्षिणेपर्यंत, क्रिकेटपासून बॅडमिंटनपर्यंत आणि संगीत जगतातील अनेक सेलिब्रिटींना 'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या शोमध्ये आमंत्रित केले आहे. पण त्याने आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोमध्ये येण्यासाठी कधी आमंत्रित केले आहे का? कपिल शर्माने अलीकडेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आणि पंतप्रधानांची त्यावर आलेली  प्रतिक्रियाही सांगितली.

कपिल शर्मा सध्या त्याच्या 'झ्विगाटो' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो लवकरच रिलीजसाठी सज्ज आहे. कपिल शर्मा या चित्रपटात डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार असून व्यक्तिरेखा खूप गंभीर आहे. अलीकडेच कपिल 'आज तक' च्या एका शोमध्ये दिसला, जिथे त्याने त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांपासून ते करिअरपर्यंत अनेक खुलासे केले. दरम्यान, जेव्हा कपिल शर्माला विचारण्यात आले की तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्याच्या शोमध्ये कधी आमंत्रित करणार आहे, तेव्हा कपिलने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा होतेय.

DDLJ: शाहरुख नव्हे तर 'या' अभिनेत्याला ऑफर झालेला DDLJ; मग कशी झाली किंग खानची एन्ट्री?

कपिल शर्मा म्हणाला, 'जेव्हा मी पंतप्रधान मोदींना भेटलो तेव्हा मी त्यांना म्हणालो की सर, तुम्ही कधीतरी आमच्या शोमध्ये या. त्यांनी मला नकारही दिला नाही. पण ते म्हणाले की सध्या माझे विरोधक खूप कॉमेडी करत आहेत...' असं काहीसं म्हणाले. कधीतरी ते माझ्या शो मध्ये आले तर माझं भाग्य.'

तसे, 2016 मध्ये कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून वादग्रस्त ट्विट केले होते, ज्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर कपिल शर्माने पीएम मोदींची माफी मागितली. कपिलने  नेटफ्लिक्सवरील त्याच्या आय 'अॅम नॉट डन यट' या शोमध्येही वादग्रस्त ट्विटची घटना सांगून प्रेक्षकांना हसवलं होतं.

कपिल शर्मा येणाऱ्या काळात 'झ्विगाटो' या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याने एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. आतापर्यंत लोकांना खळखळून हसवणारा कपिल या चित्रपटात एका भावनिक भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊन दरम्यान डिलिव्हरी बॉयची काय अवस्था झाली हे या चित्रपटात उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. कपिल शर्माचा हा  चित्रपट 17 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Kapil sharma, The kapil sharma show