मुंबई, 01 मार्च : कपिल शर्मा म्हणजे विनोदाचा बादशहा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ मधून तो वर्षानुवर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. छोट्या पडद्यावर आपल्या कलेची जादू दाखवल्यानंतर कपिल शर्माने मोठ्या पडद्यावर एंट्री घेत सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. ‘किस किसको प्यार करूं’ असं या चित्रपटाचं नाव होतं. यामध्ये तो फुल ऑन कॉमेडी करताना दिसला होता. पण त्याचा हा चित्रपट तितका लोकप्रिय ठरला नाही. पण आता अनेक वर्षानंतर कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. नुकताच त्याच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कपिल शर्मा येणाऱ्या काळात ‘झ्विगाटो’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याने एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. आतापर्यंत लोकांना खळखळून हसवणारा कपिल या चित्रपटात एका भावनिक भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊन दरम्यान डिलिव्हरी बॉयची काय अवस्था झाली हे या चित्रपटात उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. Manoj Bajpayee Wife: फॅमिली मॅन मनोज वाजपेयींची पत्नी दिसते खूपच सुंदर; बॉलिवूडपासून दूर राहत करते ‘हे’ काम हल्ली घरी बसून ऑडर करुन जेवण मागविण्याचं ट्रेड वाढतच चालले आहे. एका क्लिकवर ऑर्डर आणि काही मिनिटात दारावर आवडते पदार्थ येतात. पण ही ऑर्डर पुरवणार्या डिलिव्हरी बॉयच्या भावना काय असतात हे त्याच्या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. लोकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाइन फूड डिलेव्हरीची सुविधा या व्यवसायातील लोकांसाठी कशा प्रकारे आव्हान बनली आहे यावर आधारित चित्रपटाचं कथानक आहे.
‘झ्विगाटो’च्या ट्रेलरमध्ये ही गोष्ट चांगलीच दाखवण्यात आली आहे. कपिल शर्मा या चित्रपटात फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत आहे. ज्यात तो रेटिंगसाठी धावपळ करताना दिसतो. दोन मुलं, बायको आणि वृद्ध आई या जबाबदाऱ्यांचे ओझे घेत एका माणसाला शेवटी काय काय करणे भाग पडतं हे यात दाखवण्यात आले आहे. फूड डिलिव्हरीच्या संख्येवर आधारित अॅपचे रेटिंग आणि ते रेटिंग टिकवून ठेवण्यासाठी शक्य तितक्या ऑर्डर वितरित करण्याची धडपड यांमध्ये एखादी व्यक्ती किती हताश होऊन अडकू शकते हे ट्रेलर दाखवतो. ग्राहकापर्यंत त्याची ऑर्डर पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉयला हवामान, गर्दी आणि रस्त्यावरील ट्राफिक जाम अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सगळ्यांचं चित्रण चित्रपटात करण्यात आलं आहे.
नेहमी हसणारा आणि हसवणारा कपिल शर्मा ट्रेलरमध्ये निराश आणि हताश झालेल्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून त्याची शैली प्रेक्षकांना किती आवडेल हे येणाऱ्या काळात कळेल. नंदिता दास दिग्दर्शित हा चित्रपट 17 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. कपिल शर्माला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.