जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / DDLJ मध्ये सिमरचा राज म्हणून शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता दिसला असता; पण त्या निर्णयानं सगळंच बदललं

DDLJ मध्ये सिमरचा राज म्हणून शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता दिसला असता; पण त्या निर्णयानं सगळंच बदललं

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

तुम्हाला माहित आहे का, शाहरुखच्या आधी राजची भूमिका दुसऱ्या एका अभिनेत्याला ऑफर करण्यात झाली होती. कोण होता हा अभिनेता जाणून घ्या…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च : ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. एवढेच नाही तर हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. 1995 मध्ये रिलीज झालेला DDLJ हा चित्रपट होता ज्याने शाहरुख खानला रोमान्सचा बादशाह बनवले होते. या चित्रपटात शाहरुख राज आणि काजोलने सिमरनची भूमिका साकारली होती. या दोघांच्याही व्यक्तिरेखांना या चित्रपटात एवढी पसंती मिळाली की आजही सिनेप्रेमींना त्याची झळ बसली आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवून प्रेक्षकांनाही वेड लावले. पण तुम्हाला माहित आहे का, शाहरुखच्या आधी राजची भूमिका दुसऱ्या एका अभिनेत्याला ऑफर करण्यात झाली होती. कोण होता हा अभिनेता जाणून घ्या… राजच्या भूमिकेसाठी आदित्य चोप्राची पहिली पसंती शाहरुख खान नसून सैफ अली खान होता. मात्र, सैफ अली खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला. सैफने असं का केलं? तुमच्याही मनात हाच प्रश्न रेंगाळतोय का? जर होय, तर आम्ही तुम्हाला सांगतो. DDLJ Scene: ‘जा सिमरन जा…’ तब्बल 10 रिटेकमध्ये शूट झाला DDLJ चा ‘तो’ आयकॉनिक सीन; कुठे झालं शूटिंग? खरं तर, जेव्हा यश चोप्रांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या कथेवर काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पात्रानुसार सैफ अली खानला मुख्य अभिनेता म्हणून घेण्याचा विचार केला. ज्याचे कारण होते सैफ अली खानची बोलण्याची शैली आणि त्याचे उच्चार. इंडो अमेरिकन अफेअरच्या या कथेत सैफ अली खान अगदी फिट बसेल असे त्यांना वाटले होते, पण जेव्हा त्यांनी सैफकडे चित्रपटाची ऑफर आणली तेव्हा त्याने वेळ आणि तारखा नसल्यामुळे चित्रपट करण्यास नकार दिला. एकीकडे सैफ अली खानने नकार दिला आणि दुसरीकडे ही भूमिका शाहरुख खानला ऑफर करण्यात आली. शाहरुख खानने या चित्रपटाला होकार दिला आणि त्यांचं नशीब चमकलं. या चित्रपटाने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले, जिथे आजही अनेक कलाकार पोहोचण्याचे स्वप्न पाहतात. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज झाल्यानंतर अनेक मुलींनाही राजसारखा प्रियकर मिळण्याची स्वप्ने पडू लागली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या प्रत्येक दृश्याला आणि प्रत्येक संवादाला थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अमरीश पुरीचं ‘जा सिमरन जा..जी ले अपनी जिंदगी’ ते सिमरनचं म्हणणं असो किंवा शाहरुखचा ‘पलट’ डायलॉग असो आजही या सिनेमाचे लाखो चाहते आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

1995 साली आलेला ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट 90 च्या दशकातील सर्वात मोठा हिट चित्रपट होता. अवघ्या 4 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 89 कोटींची कमाई केली. तर परदेशात 13 कोटींची कमाई केली. या चित्रपटातील गाणी, संवाद आणि दृश्ये आजही स्मरणात आहेत. 27 वर्षांपासून ‘मराठा मंदिर’ नाट्यगृहात सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात