मुंबई, 04 सप्टेंबर : सुशांत सिंह रजपूत प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर आल्यानंतर आता रिया-शोविक आणि सॅम्युल मिरांडा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. शोविक आणि रियाचे ड्रग्ज विषयी चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स विभागाची एका टीमनं रियाच्या घरी शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे. तर दुसरी टीम सॅम्युल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. सॅम्युल मिरांडाविरोधात NCB टीमकडे पुरावे असल्यानं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर रिया आणि शोविकला अटक होणार का? हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या दोन्ही ठिकाणी NCBकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
हे वाचा- “तो 4 वेळा स्मोक करतो, तसा प्लॅन करा”, रिया-शोविकचे ड्रग्जविषयी चॅट उघड
Maharashtra: Officers of Narcotics Control Bureau (NCB) reach the residence of #RheaChakraborty in Mumbai. An officer (in pic 4) says, "It's just a procedural matter. That is what we are following. It is being done at Rhea's and Samuel Miranda's house." https://t.co/2qMW4jyDqK pic.twitter.com/307I6bqZCn
— ANI (@ANI) September 4, 2020
हे वाचा- NCB करणार बॉलिवूड कलाकारांची चौकशी; अटक झालेल्या आरोपींचा सुशांत प्रकरणाशी संबंध नार्कोटिक्स विभागाने (NCB) आतापर्यंत अंमली पदार्थांच्या व्यवहारांबद्दल अटक केलेल्या आरोपींचा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा खुलासा NCB सूत्रांनी केला आहे. शोविक आणि रियाचे एक्स्लुझिव्ह चॅट समोर आल्यानंतर छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय NCB च्या ताब्यात असलेला जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शोविक चक्रवर्तीच्या संपर्कात होता. जैद याच्याकडून 17 तारखेला शोविकने अंमली पदार्थ घेतले होते अशीही एक माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.