Home /News /entertainment /

NCB आता करणार बॉलिवूड कलाकारांची चौकशी; अटक झालेल्या आरोपींचा सुशांत प्रकरणाशी थेट संबंध

NCB आता करणार बॉलिवूड कलाकारांची चौकशी; अटक झालेल्या आरोपींचा सुशांत प्रकरणाशी थेट संबंध

नार्कोटिक्स विभागाने (NCB) आतापर्यंत अंमली पदार्थांच्या व्यवहारांबद्दल अटक केलेल्या आरोपींचा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी (Drug angle in SSR case) थेट संबंध असल्याचा खुलासा NCB सूत्रांनी केला आहे.

मुंबई, 3 सप्टेंबर : नार्कोटिक्स विभागाने (NCB) आतापर्यंत अंमली पदार्थांच्या व्यवहारांबद्दल अटक केलेल्या आरोपींचा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा खुलासा NCB सूत्रांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी NCB काही बॉलिवूड कलाकारांची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपासाला रिया चक्रवर्तीच्या ड्रग्ज कनेक्शनमुळे वेगळंच वळण मिळालं आहे. रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचा काही ड्रग्जचे व्यवहार करणाऱ्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून चौकशी सुरू झाली. या प्रकरणी NCB ने आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. त्यात एकाला गोव्यातूनही अटक झाली आहे. याच आरोपींनी बाॅलिवूड जगतातील अनेकांना अंमली पदार्थ दिल्याचा दावा एनसीबीने केला आहे. NCB ने अटक केलेल्यापैकी जैद विलोत्रा या अंमली पदार्थ तस्कराला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला 14 दिवसांची NCB कोठडी मिळावी, अशी मागणी एनसीबीने न्यायालयात केली होती. त्यावर जैद विलोत्राची 7 दिवसांकरता म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी न्यायालयाने मान्य केली आहे. सुशांत प्रकरणाशी जैदचा संबंध धक्कादायक म्हणजे जैद विलोत्रा याचा थेट संबंध सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी असल्याचा संशय एनसीबीला आहे. जैद आणि त्याच्या साथीदारांनी बाॅलिवूड मधील अनेक सिनेतारकांना अंमली पदार्थ पुरवल्याचे एनीसीबी तपासात जैदने कबूल केलं आहे. त्यामुळे जैद आणि बसित यांच्या संपर्कात असलेल्या बाॅलिवूड कलाकारांची चौकशी करण्यात येणार आहे. काल एका मागोमाग एक काही तासांतच NCB ने चार जणांना अटक केली. यांत मुंबईहून जैद विलोत्रा, बसित परिहार, कुणाल अरोरा आणि अब्बास लखानी यांना अटक केली. त्यांच्या NCB कोठडीची तयारी करण्यातच बराच वेळ गेल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं नव्हतं. या चौघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर केलं. तत्पूर्वी NCB ने मुंबईत छापेमारी सुरूच ठेवली आहे. आज आणखी दोघांना NCB ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोण आहे जैद? NCB च्या ताब्यात असलेला जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शोविक चक्रवर्तीच्या संपर्कात होता. या जैदने अनेकवेळा शौविकला अंमली पदार्थांची डिलेव्हरी केली आहे, असं तपासात उघड झालं. त्यामुळे NCB ला शंका आहे की रियादेखील शोविक कडून अंमली पदार्थ घेत असावी. रियाच्या आधी शोविक चक्रवर्तीला NCB ताब्यात घेणार, असं बोललं जात आहे. जैद याच्याकडून 17 तारखेला शोविकने अंमली पदार्थ घेतले होते. Whatsapp चॅटमुळे लागला सुगावा याच अंमली पदार्थ प्रकरणी NCB ने काल पहाटे बसीत नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील ताब्यात घेतलं. या बसीतनेच जैदची ओळख शोविकशी करून दिली होती. बसीत हा शोविकचा खास मित्र असून शोविक, बसीत आणि जैद अशी तिघांची जोडी होती. जैद हा बांद्र्याला राहतो. त्याचं पूर्ण नाव जैद विलात्रा आहे. या ड्रग कनेक्शनचा छडा लागला एका whatsapp चॅटमुळे. NCB च्या हाती एक व्हॉट्सपचॅट लागलं, ज्यात या जैद आणि बसीतची नावं आहेत. जैद सॅम्युल मिरांडाच्या देखील संपर्कात होता आणि सॅम्युल मिरांडा हा रियाचा उजवा हात असल्याचं समोर आलं आहे. जैदचे बसीत आणि सूर्यदिप मल्होत्रा नावाच्या दोन तरुणांसोबत whatsapp चॅट समोर आले आहेत. सूर्यदीपदेखील शौविकशी संपर्कात असलेल्यांपैकी एक आहे. 17 मार्च 2020 या दिवशी शोविकने सॅम्युल मिरांडाला जैदचा नंबर दिला होता आणि सॅम्युलला 5g बदल्यात १० लाख रुपये द्यायला सांगितले होते. असं NCB च्या तपासातून स्पष्ट झालं आहे.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Sushant Singh Rajput

पुढील बातम्या