Home /News /entertainment /

Exclusive - "तो 4 वेळा स्मोक करतो, तसा प्लॅन करा", रिया-शोविकचे ड्रग्जविषयी चॅट उघड

Exclusive - "तो 4 वेळा स्मोक करतो, तसा प्लॅन करा", रिया-शोविकचे ड्रग्जविषयी चॅट उघड

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी (sushant singh rajput) रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) आणि तिचा भाऊ शोविकचे (showik chakraborty) ड्रग्जबाबतचे चॅटही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत.

मुंबई, 03 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी तपासाला रिया चक्रवर्तीच्या (rhea chakraborty) ड्रग्ज कनेक्शनमुळे वेगळंच वळण मिळालं आहे. रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचा काही ड्रग्जचे व्यवहार करणाऱ्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून चौकशी सुरू झाली. याबाबत रियाचे ड्रग्जबाबत अनेक चॅट समोर आले आहेत. आता रिया आणि तिचा भाऊ शोविकचे ड्रग्जविषयीचे चॅटही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत. रिया आणि शोविकचे 15 मार्च 2020 रोजीचे चॅट समोर आले आहेत. यामध्ये ते एक योजना आखत आहेत, यामध्ये त्यांनी बड नावाच्या अमली पदार्थांचा उल्लेख केला आहे. रिया आणि शोविकच्या चॅटमध्ये काय आहे? रिया : तो दिवसातून 4 वेळा धूम्रपान करतो, म्हणून त्यानुसार योजना बनवा. शोविक : आणि त्याला बडची गरज आहे का ? रिया : होय, बड देखील शोविक : ठिक आहे आपल्याला 5 ग्रॅम बड मिळू शकतं. एकूण 20 डूब्स. बड म्हणजे गांज्याची फुलं आणि रिया-शोविकच्या संवादात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नार्कोटिक्स विभागाने (NCB) आतापर्यंत अंमली पदार्थांच्या व्यवहारांबद्दल अटक केलेल्या आरोपींचा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा खुलासा NCB सूत्रांनी केला आहे. आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. यात काल मुंबईहून जैद विलोत्रा, बसित परिहार, कुणाल अरोरा आणि अब्बास लखानी यांना अटक केली. आज आणखी दोघांना NCB ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे वाचा - NCB करणार बॉलिवूड कलाकारांची चौकशी; अटक झालेल्या आरोपींचा सुशांत प्रकरणाशी संबंध NCB च्या ताब्यात असलेला जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शोविक चक्रवर्तीच्या संपर्कात होता. या जैदने अनेकवेळा शौविकला अंमली पदार्थांची डिलेव्हरी केली आहे, असं तपासात उघड झालं. त्यामुळे NCB ला शंका आहे की रियादेखील शोविक कडून अंमली पदार्थ घेत असावी. रियाच्या आधी शोविक चक्रवर्तीला NCB ताब्यात घेणार, असं बोललं जात आहे. जैद याच्याकडून 17 तारखेला शोविकने अंमली पदार्थ घेतले होते. हे वाचा - 'न्याय द जस्टिस...', सुशांतनंतर आता रिया चक्रवर्तीवर देखील बनतोय सिनेमा याच आरोपींनी बाॅलिवूड जगतातील अनेकांना अंमली पदार्थ दिल्याचा दावा एनसीबीने केला आहे.  त्यामुळे आता या प्रकरणी NCB काही बॉलिवूड कलाकारांची चौकशी करण्याच्या तयारीत आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sushant Singh Rajput

पुढील बातम्या