छत्रपती शिवाजी महाराजांवर नागराज मंजुळे करणार 3 सिनेमांची निर्मिती

छत्रपती शिवाजी महाराजांवर नागराज मंजुळे करणार 3 सिनेमांची निर्मिती

अभिनेता रितेश देशमुख या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे त्यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. वास्तव, काटेकोर आणि साधेपणा ही त्यांच्या सिनेमांची वैशिष्ट्य मानली जातात. आता पर्यंत 'फॅन्ड्री', 'सैराट' सारख्या सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे नागराज मंजुळे आता महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित 3 सिनेमा तयार करत आहेत. आज शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन याची माहिती दिली.

नागराज मंजुळे यांनी त्याच्या ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या सिनेमांची नावं सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित ‘शिवाजी’, ‘राजा शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी’ या 3 सिनेमांची मालिका लवकरच नागराज मंजुळे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

TOPLESS फोटोशूट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कियारा अडवाणीला घातले कपडे

ट्विटरवर याचा प्रोमो शेअर करताना नागराज मंजुळे यांनी लिहिलं, ‘एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी ‘शिवाजी’, ‘राजा शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी’ शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा.’

डब्बू रत्नानीसाठी Topless झाली भूमि पेडणेकर, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

नागराज मंजुळे यांनी या सिनेमांची घोषणा केली असली तरही या सिनेमात कलाकार कोण असणार आहे? याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण नागराज मंजुळे या सिनेमांचं दिग्दर्शन करणार आहे तर अभिनेता रितेश देशमुखची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे हे मात्र नक्की. हे सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

शाहरुखच्या 'कावेरी अम्मां'चं निधन, आशुतोष गोवारिकरही झाले भावुक

First published: February 19, 2020, 3:27 PM IST

ताज्या बातम्या