Home /News /entertainment /

TOPLESS फोटोशूट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कियारा अडवाणीला घातले कपडे

TOPLESS फोटोशूट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कियारा अडवाणीला घातले कपडे

डब्बू रत्नानीसाठी केलेल्या फोटोशूटमुळे कियारा अडवाणीला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे.

  मुंबई, 19 फेब्रुवारी : बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीचं कॅलेंडर नुकतंच लॉन्च झालं. सोशल मीडियावर यंदाच्या या कॅलेंडर फोटोशूटचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. एकीकडे अभिनेत्री भूमि पेडणेकरनं या कॅलेंडरसाठी केलेल्या टॉपलेस फोटोशूटची चर्चा आहे. तर दुसरीकडे कियारा अडवाणीचाही या कॅलेंडरसाठी केलेला बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पण या फोटोमुळे नेटकऱ्यांनी डब्बू रत्नानी आणि कियारा अडवाणीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. कियारा अडवाणीनं यंदा डब्बू रत्नानीसाठी पहिल्यांदाच फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये कियारा टॉपलेस असून एका पानाच्या मागे उभी आहे. कियारानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला. ज्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एवढंच नाही त्यांनी कियाराचा फोटो एडिट करुन तिला कपडे घालण्याचा पराक्रमही केला आहे. शाहरुखच्या 'कावेरी अम्मां'चं निधन, आशुतोष गोवारिकरही झाले भावुक
  View this post on Instagram

  A leaf out of #DabbooRatnaniCalendar! @dabbooratnani @manishadratnani

  A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

  कियारा अडवाणीच्या फोटोशूटचं एकीकडे सोशल मीडियावर कौतुक होत आहे तर दुसरीकडे कियारा आणि फोटोग्राफर डब्बू रत्नानीला ट्वीटवर जोरदार ट्रोल करण्यात आलं आहे. काहींनी या फोटोला कबीर सिंहशी जोडत मीम्स शेअर केले आहेत. जे पाहिल्यावर त्यांच्या क्रिएटीव्हिटीची दाद द्यावी लागेल. तर काही युजर्सनी हा फोटो मॉर्फ करत कियारा अडवाणीला कपडे घातले आहेत. सध्या सोशल मीडियावर हे मीम्स खूप व्हायरल होत आहेत. माधुरीच्या पहिल्या हिरोचं निधन, झाला होता 13 महिन्यांचा तुरुंगवास यावर्षी डब्बू रत्नानीसाठी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन, जॉन अब्राहम, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, वरुण धवन, सैफ अली खान, आलिया भट, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, सनी लिओनी, कियारा अडवाणी कृती सेनन, भूमि पेडणेकर, अनन्या पांडे, रेखा, विद्या बालन या बॉलिवूड सेलिब्रेटींनी फोटोशूट केलं आहे. ‘माझ्या नावाचा वापर करणं थांबव नाहीतर...’ नेहानं एक्स बॉयफ्रेंडला दिली ताकीद
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या