मुंबई, 18 ऑक्टोबर: 'माझी मुलं हा माझा सर्वांत मोठा प्रेरणास्रोत (Motivation) आहे आणि मी अधिकाधिक चांगली व्यक्ती म्हणून विकसित होण्यामागची शक्ती आहेत. माझी मुलंच माझ्या जगण्याचं कारण आहेत,' असं अभिनेत्री आणि प्रसिद्ध निवेदिका मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिने म्हटलं आहे. तिचे पती, दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचं जून महिन्यात अकस्मात निधन झालं होतं. अचानक बसलेल्या त्या धक्क्यातून ती आता सावरत असून, 10 वर्षांचा मुलगा वीर आणि पाच वर्षांची मुलगी तारा हेच आपलं विश्व असल्याचं मंदिराने म्हटलं आहे.
'सतत संघर्ष करत राहणं, कार्यरत राहणं आणि अधिकाधिक उत्तम कार्य करत राहणं, यातूनच मला प्रेरणा मिळते. माझं सर्वांत मोठं प्रेरणास्थान म्हणजे माझी मुलं आहेत. मी जे काही करते, ते त्यांच्यासाठीच करते. माझ्या पुढे जाण्याचं, जगण्याचं, चांगलं काम करण्याचं आणि चांगलं बनण्याचं कारण तीच आहेत. त्यांच्यामुळेच माझ्यात धैर्य, क्षमता आहे. मला त्यांचं पालकत्व (Parent) उत्तमपणे निभावायचं आहे,' असं मंदिरा बेदीने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा- जेव्हा घरात पाल येते... सिद्धार्थ-मिताली सेलेब्रिटी कपलच्या घरातला VIDEO आला बाहेर
'आयुष्यात अनेक आव्हानं होती, पडता काळ आव्हानात्मक होता; पण नागरिकांची स्मृती अल्पकाळाची असते. सगळ्यात शेवटी केलेल्या कामावरून तुमची ओळख बनते. मी आधीही बरंच काम केलं आहे. प्रगतीचा काळ सुखाचा असतो आणि तुम्ही जेव्हा तो अनुभवत असता, तेव्हा तर तो खूपच सुंदर असतो. जेव्हा तुमचा पडता काळ असतो, तेव्हा तुम्ही चांगल्या काळाची प्रशंसा करता. यशापेक्षा अपयशातून तुम्ही बरंच काही शिकता. पडता काळ तुम्हाला जगण्याची दिशा देतो, अशी रीतीने मी त्याच्याकडे पाहते. मी माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा सामना केला आहे आणि त्यातून मी शिकले आहे,' असं मंदिराने नमूद केलं.
हेही वाचा- ही चित्रपट निर्माती भागवते तान्ह्या जीवांची भूक; आतापर्यंत दान केलंय 100 लिटर ब्रेस्ट मिल्क
आपल्या करिअरच्या या टप्प्यावर असताना ज्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं होतं, तसंच काम आपल्याला या शोच्या माध्यमातून करायला मिळत असल्याचं मंदिराने सांगितलं. तिशीत असताना आपल्याला प्रचंड असुरक्षित वाटत होतं, असं सांगतानाच, सध्याच्या टप्प्यात असंख्य संधी आपल्यासमोर आहेत असं ती म्हणाली. 'मला वाटेल तोपर्यंत मी उत्तम काम करत राहीन असा विश्वास मला आता वाटतो आहे,' असं ती म्हणाली.
हेही वाचा- 'कारट्यांनो किती धुडगूस घालता रे...' Bigg Boss Marathi च्या घरात खास व्यक्तीची एन्ट्री
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Mandira bedi