नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : बिग बॉस मराठी सीजन 3 च्या ( Bigg Boss Marathi 3) या आठवड्यात सुरेखा कुडची घराबाहेर झाल्या. आता या नॉमिनेशननंतर नव्या आठवड्यात नवं टास्क होणार आहे. इतर टास्कप्रमाणे हे टास्कही भन्नाट असणार आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरात एका खास व्यक्तीचं स्वागत केलं. बिग बॉसकडून खास व्यक्तीची घोषणा झाल्यानंतर सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये आले आणि त्यांना खास व्यक्ती घरात आल्याचं दिसलं. घरात दुसरं-तिसरं कोणी नाही, तर आजीचा आवाज घुमला. “कारट्यांनो किती धुडगूस घालता रे… हा संपूर्ण आठवडा माझी तुमच्यावर नजर असणार आहे. चला लागा तयारीला” असं म्हणत या खास टास्कला सुरूवात होणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आजी हे नातं अतिशय खास असतं. प्रत्येक वेळेला निरपेक्ष भावनेने काही ना काही देणारी, आई वडील ओरडल्यावर जवळ घेणारी, आपली मैत्रिण होणारी, आपल्यासोबत खेळणारी, लाड पुरवणारी आजी सर्वांसाठी खासच असते. अशाच या प्रेमळ आजीचं बिग बॉसच्या घरात स्वागत होणार आहे. ही आजी काय-काय करते, कशी धमाल-मस्ती येते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले होते. या आठ जणांमधून शेवटी स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची डेंजर झोनमध्ये होते. महेश मांजरेकर यांनी, या आठवड्यात सुरेखा कुडची यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावं लागेल अशी घोषणा केली.
Bigg Boss 15: इशान-मायशाचे ‘ते’ चाळे पाहून भडकला सलमान; सुनावले खडेबोल
आठवड्यातील बिग बॉसची चावडीमध्ये बिग बॉस मराठीच्या मागील पर्वातील दोन लोकप्रिय असे टॉप टू स्पर्धक आले होते. ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सिझन 2 चा विजेता शिव ठाकरे आणि दुसरे स्थान पटकावलेली नेहा शितोळे घरात आले होते. त्यांनी स्पर्धकांची कानउघडणी केली. यासोबतच रोज डे देखील सेलिब्रेट केला. बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. तर चुगली बूथद्वारे सोनाली पाटीलला तिच्याविरुध्द सदस्य जे बोलत होते ते तिच्या फॅनने सांगितले. जय आणि आदिशचा रोमॅंटिक डान्स बघायला मिळाला. तर, सदस्यांनी एकमेकांनबद्दल असलेल्या तक्रारी सदस्यांना सांगितल्या.